Breaking News

सोलापूरात ११४ वर संख्या पोहोचली ३२ पैकी २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह

सोलापूर: प्रतिनिधी
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आज ३२ जणाचे पाठविण्यात आलेले अहवालापैकी २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यापैकी ३ जण कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले असून आता रूग्णांची संख्या ११४ वर पोहोचली आहे.
नव्याने बाधीत असलेले रूग्ण आकाशवाणी रोडवरील गवळी वस्ती येथील एक जण असून पोलिस मुख्यालय अशोक चौकातील २ जण रूग्ण आहेत.
सद्यपरिस्थितीत होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या ४ हजार ६३७ आहे. तर संस्थात्मक विलगीकरण कक्षात २२५६ जण आहेत. आतापर्यत जवळपास १९७३ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी १६७४ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १५६० जणांचे अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. २९९ जणांचे अहवाल प्रलंबित असून ११४ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आढळून आल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *