Breaking News

Tag Archives: aslam shaikh

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभुमीवर गर्दी नको, घरातूनच अभिवादन करा अभिवादन, मानवंदनेचे थेट प्रक्षेपण; ऑन-लाईन माध्यमातून दर्शन

मुंबई : प्रतिनिधी महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून …

Read More »

सरकार देणार मच्छिमारांना १० ते ३० हजाराचे आर्थिक सहाय्य राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “क्यार”  व  “महा” या दोन चक्रीवादळामुळे मच्छीमारांना मासेमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल ६५ कोटी १७ लाख इतके विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. रापणकार संघाचे सभासद असणाऱ्यांना प्रति सभासद १० हजार रुपये असे ४ हजार १७१ सभासदांना ४ …

Read More »

आता तुमच्या आवाजावरुन ओळखणार “कोरोना” पालकमंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला ऑनलाइन प्रारंभ

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे व्हॉईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला. या यंत्रणेद्वारा व्यक्तिच्या किंवा संशयीत रुग्णाच्या आवाजावरुन त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, …

Read More »

व्यायामशाळा आणि केशकर्तनालये पुढच्या आठवड्यापासून सुरू मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील व्यायामशाळा व केशकर्तनालये (सलून) येत्या आठवड्याभरात सुरु होणार असून येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतची नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीनंतर शेख यांनी ही माहिती दिली. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत …

Read More »

कोरोना: आजही मुंबईत सर्वाधिक मृत्यू तर रूग्णसंख्येतही वाढच काल ११४ आज १३६ जणांचा मुंबईत मृत्यू तर ३८७४ नवे बाधित रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्येत वाढच होत असून रूग्णांच्या मृत्यूच्या आकड्यातही वाढ होत आहे. दैनदिंन रूग्ण आणि मृतकांच्या संख्येत मुंबईतील संख्याचा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मागील २४ तासात राज्यात १६० जणांच्या मृत्यूची नोंद झालेली असताना यातील १३६ जणांच्या मृत्यूची संख्या एकट्या मुंबईतील आहे. काल हिच संख्या ११४ वर होती. नव्या …

Read More »

काँग्रेस मंत्र्यांचा निर्णय, अडकलेल्या मजूरांचा प्रवास खर्च उचलणार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत कामगारांचा प्रवास खर्चाबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात अडकून पडलेल्या सर्व स्थलांतरित मजूरांच्या प्रवासाचा खर्च महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उचलणार आहे. यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाईन सुरु करून मजूरांची माहिती घेतली जाणार आहे व जिल्हाधिकारी व रेल्वे अधिका-यांना पत्र लिहून आवश्यक तो निधी …

Read More »

मुंबई महानगराची वाटचाल १० हजाराकडे: नव्याने ७९० सापडले मुंबई-ठाणे मिळून ९ हजार ७०९ वर संख्या पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी दोनच दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या १० हजारने ओलांडली असताना मुंबई आणि ठाणे मंडळ मिळून लवकरच ही संख्या ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्यात नव्याने ७९० रूग्ण आढळून आले असून राज्याची संख्या १२ हजार २९६ वर पोहोचली आहे. तर मुंबई शहरातील बाधितांची संख्या ८ हजार ३५९ वर …

Read More »

मुंबई-पुण्यात यायचंय-जायचंय? अजिबात विचार करायचा नाही बाकीच्या रेड झोनमधील प्रवेशाचा निर्णय पोलिस आयुक्तांकडे

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी, यात्रेकरू आणि पर्यटक यांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी प्रवासाची मूभा देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आंतरजिल्हा प्रवासासही मूभा दिली. मात्र मुंबई महानगरातून बाहेर जायचंय किंवा यायचंय तर अजिबात विचार करायचा नाही. या महानगरातून बाहेर जाण्यासाठी किंवा येण्यासाठी कोणतीही परवानगी न देण्याचा निर्णय राज्य …

Read More »

९ हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार करत राज्यात ३१ जणांचा मृत्यू मुंबई महानगराची संख्या ७ हजार २२३ वर

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊन, संचारबंदी आदी गोष्टींची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढच होत असून आज सर्वाधिक ३१ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात नव्याने ७२९ रूग्ण आढळून आले असून ९ हजार ३१८ वर संख्या …

Read More »

मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५२० वर पोहोचली नवे रूग्ण २२१ , तर राज्यातील संख्या २ हजाराच्या जवळ

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील  कोरोनाग्रस्तांची संख्येवर नियंत्रण मिळविणे अवघड दिसत असतानाच मुंबई महानगर प्रदेशातील मुंबईसह ११ महानगरपालिका हद्दीतील कोरोनाग्रस्तांची संख्या थेट १ हजार ५२० वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबई शहरासह महानगर प्रदेशातील संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या खालोखाल पुणे महानगर प्रदेशाचा नंबर असला तरी त्याची संख्या हजाराच्या …

Read More »