Breaking News

गोव्याचे ‘मनोहर‘ यांचे निधन दिर्घ आजारने वयाच्या ५५ व्या वर्षी शेवटचा श्वास

पणजी : प्रतिनिधी

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने रविवारी (दि.१७) निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेल्या पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या एक वर्षापासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. यावर त्यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालय, अमेरिका आणि दिल्लीच्या एम्समध्ये उपचार घेतले होते.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राष्ट्रपती रामनाथ कोंविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, भाजप आणि इतर पक्षाच्या नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेकांनी त्यांना ट्वीटरवरून श्रध्दांजली वाहीली.

मुख्यमंत्री पर्रिकरांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रीमंडळाची उद्या सकाळी ११ वाजता बैठक बोलवण्यात आली असून यावेळी पर्रिकरांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

मुंबईतील आयआयटीतून मेटलर्जीमध्ये त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. १९९४ मध्ये पर्रिकर पहिल्यांदा गोवा विधानसभेवर निवडून गेले. ऑक्टोबर २००० मध्ये ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, जून ते नोव्हेंबर १९९९ या काळात विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर २०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर २०१४-१७ या काळात त्यांच्यावर संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या या कार्यकाळातच सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय घेण्यात आला होता. मार्च २०१७ मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा देत ते पुन्हा गोव्यात परतले आणि पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री बनले.

 

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *