Breaking News

अखेर केंद्रीय अर्थ मंत्रालयाला आले भान: पेट्रोल-डिझेल इतक्या रूपयांनी स्वस्त पेट्रोल-डिझेलवरील करात केली कपात

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

मागील ८ ते ९ महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज ३० पैसे ४५ पैशाने वाढ करत पेट्रोलच्या दराने ११० रूपयांचा टप्पा पार केला. तर डिझेलनेही १०० री पार करत महागाई वाढीला हातभार लावला. त्यामुळे आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला या भाव वाढीमुळे नागरीकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र ऐन दिवाळीत सर्वसामान्य नागरीकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट करात घट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पेट्रोल ५ रूपयाने तर डिझेल १० रूपयाने स्वस्त दरात उद्या गुरूवारपासून मिळणार आहे.

परंतु देशातील या दरवाढीला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने वेगळेच तार्किक कारण जोडत आंतरराष्ट्रीयस्तरावर कच्च्या तेलाचा तुटवडा आणि वाढलेल्या दरामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढ झाल्याचा खुलासा केला आहे. तसेच आता देशाला या इंधनाचा पुरवठा कमी पडू नये आणि माफक दरात इंधन उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचे अर्थमंत्रालयाने सांगत त्याचाच एक भाग म्हणून पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट करात कपात करण्यात आल्याचे जाहीर करत उद्या गुरूवार पासून पेट्रोल ५ रूपये आणि डिझेल १० रूपयाने स्वस्त दरात मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात होणार असल्याचेही केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले.

कोरोना काळानंतर देशातील अर्थव्यवस्थेत एकप्रकारची मरगळ आली असून त्यातच पेट्रोल-डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे वित्तीय बाजारात, कारखान्यांच्या उत्पादनात, सेवा क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे आता या दोन्ही गोष्टींवरील व्हॅट करात कपात केल्याने आता अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी आशाही व्यक्त करण्यात आली आहे.

त्याचबरोबर देशातील राज्य सरकारांनीही पेट्रोल-डिझेलवर लावण्यात आलेले व्हॅटच्या करात कपात करून नागरीकांना आणखी स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल उपलब्ध करून द्यावे असे आवाहनही केंद्राने केले.

भारतातील बहुतेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहे आणि जवळपास दररोज ३५ पैशांनी महाग होत आहे. ४ ऑक्टोबर २०२१ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत पेट्रोलच्या दरात सरासरी ८ रुपयांनी वाढ झाली. महाराष्ट्रातील सोलापूर, मुंबई, परभणी आदींसह अनेक शहरांमध्ये पेट्रोलने ११० रूपयांचा टप्पा कधीच पार केला आहे. तर डिझेल शंभरीपार मिळत आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *