Breaking News

अर्थसंकल्प तर सादर झाला, एलआयसीचा आयपीओ लवकरच,पण काय स्वस्त होणार? वाचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली या गोष्टींची घोषणा

मराठी ई-बातम्या टीम

मॉ़नटायझेन पॉलिसी अंतर्गत निधी उभारणीसाठी लवकरच एलआयसीचा आयपीओ बाजारात आणण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प मांडताना जाहीर केली. मात्र आयपीओ बरोबरच देशात आयात होणाऱ्या वस्तुंवरील करात वाढ करण्यात येणार असल्याचे सुतोवाच करत देशांतर्गत बाजारपेठेत काही वस्तुंवरील कर कमी करण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी जाहीर केला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना कस्टम ड्युटी वाढवण्याचं सुतोवाच केलं. त्यामुळे आता बाहेर देशातून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. यात खालील गोष्टींचा समावेश आहे.

या वस्तू होणार महाग

१. छत्री
२. हेडफोन
३. इअरफोन
४. लाऊडस्पिकर
५. स्मार्ट मीटर
६. सोलर सेल
७. सोलर मॉड्युल
८. एक्स रे मशिन
९. इलेक्ट्रिक खेळण्याचे भाग

या वस्तू होणार स्वस्त

  • कापड
    २. चमड्याच्या वस्तू
    ३. मोबाइल
    ४. फोन चार्जर
    ५. चप्पल
    ६. हिऱ्यांचे दागिने
    ७. शेतीची साधनं
    ८. गोठलेले शिंपले
    ९. हिंग
    १०. कोको बिन्स
    ११. मिथाइल अल्कोहोल
    १२. व्हिनिगरचे आम्ल (Acetic Acid)
    १३. पेट्रोलियम उत्पादनांसाठी आवश्यक केमिकल
    १४. मोबाईल फोनच्या कॅमेरा लेन्स
    १५. स्टिल स्क्रॅब

याशिवाय कार्पोरेट टॅक्स आणि सहकारी संस्थांच्या टॅक्सबाबतही हा निर्णय घेण्यात आला

  • कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरुन १५ टक्क्यांवर
  • त्यावर लागणारा सरचार्जही कमी करण्यात आला असून १२ टक्क्यांवरुन ७ टक्क्यांवर आणला
  • कॉर्पोरेट टॅक्सची मर्यादा १० कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे
  • इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये चूक झाल्यास सुधारण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळेल
  • पेंशमध्ये करावर सवलत –
  • क्रिप्टो करन्सीवर होणाऱ्या कमाईवर ३० टक्के कर

Check Also

मारूती-सुझुकी आणि ह्युंदाईच्या कार विक्रीत किरकोळ वाढ स्पोर्टस युटिलिटी व्हेइकल्सला सर्वाधिक मागणी

देशातील आघाडीच्या कार निर्माते – मारुती सुझुकी (MSIL) आणि Hyundai Motor India (HMIL) – यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *