Breaking News

नितेश राणे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला: पुन्हा उच्च न्यायालयात धाव अटक मात्र नाही परंतु कधीही होवू शकते

मराठी ई-बातम्या टीम

जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारा दरम्यान संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना संबधित न्यायालयात दाद मागण्याची सूचना करत अटकपूर्ण जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र त्यासाठी १० दिवसांचा दिलासा देण्यात आला होता. त्यानुसार नितेश राणे यांनी सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयात पुन्हा जामीनासाठी अर्ज केला. तेव्हा न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांच्या युक्तीवादानंतर पुन्हा एकदा त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे राणे कुटुंबियाना मोठा धक्का बसला आहे.

नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर नितेश राणे यांचे वकील सतीश माने-शिंदे यांनी त्यांची बाजू मांडली. त्यानंतर सरकारी वकील घरत यांच्या युक्तीवादासाठी दोन दिवस लागले. त्यानंतर घरत यांनी सोमवारी युक्तीवाद केल्यानंतर आज मंगळवारी दुपारपर्यत आपले म्हणणे राखून ठेवले होते. आज न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला. मात्र यावेळी कोर्टाबाहेर नितेश राणेंची गाडी अडवण्यावरुन निलेश राणे आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण बनले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली होती. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर संतोष परब यांच्यासाठी अ‍ॅड प्रदीप घरत तर आमदार राणे यांच्यासाठी अ‍ॅड सतीश मानशिंदे यांनी सोमवारी युक्तिवाद केला.

नियमित अर्ज फेटाळून लावल्यानंतर नितेश राणे यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून आता मुंबई उच्च न्यायालय काय निकाल देते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे. आता हायकोर्टात काय निकाल लागतो हे पहावे लागणार आहे.

दरम्यान शिवसेना नेत्यांकडून राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले असून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, नितेश राणे यांना आधी शरण जावे लागेल शरण गेल्यानंतर त्यांना जामीन मिळू शकेल. मात्र त्यासाठी अटक होणे आवश्यक आहे. तर अटक झाल्याशिवाय जामीन मिळू शकत नाही. त्यामुळे ते उच्च न्यायालयात गेले आहेत. परंतु अटकेशिवाय जामीन मिळू शकत नाही.

तर सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले की, नितेश राणे यांना अटक करण्याबाबतचा योग्य निर्णय पोलिस घेतील. पोलिस सर्वोच्च न्यायालयाच्या आणि आजच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून निर्णय घेतील. नितेश राणे यांना कधी, कुठे अटक करायचे हे पोलिस ठरवतील.

Check Also

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी दोन भारत निर्माण करतायत

पुणे येथील कल्याणी नगर भागात करोडपती विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने दारू पिऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *