Breaking News

बीडमध्ये बोगस मतदानाचे २०० व्हिडिओ, पुर्नमतदान घ्या राष्ट्रवादीची मागणी शरद पवार यांच्या उपस्थितीतच केली मागणी

नुकतेच लोकसभा निवडणूका पार पडल्या त्यात बीड लोकसभा मतदारसंघात ४ थ्या टप्प्यात मतदान पार पडले. मात्र मतदानाच्या दिवशी बीड जिल्ह्यातील परळी आणि इतर काही भागात बोगस मतदान करण्यात आल्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले. या पार्श्वभूमीवर बीडमधील बोगस मतदानाची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच बोगस मतदान झालेल्या ठिकाणी पुर्नमतदान घेण्याची मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने यावेळी करण्यात आली.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीची आणि पाणी साठ्याची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी शरद पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाड, महेश तपासे आदी नेते उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बीड मधील बोगस मतदानाबाबत प्रश्न विचारला असता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, बीड मध्ये बोगस मतदान झाल्याचे किमान २०० व्हिडिओ आमच्याकडे आहेत. त्या आधारे बोगस मतदान झाल्याचे सिध्द करू असेही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वकीलांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातही मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची अमिषे दाखविण्यात आल्याचे आणि त्यासाठी सहकारी बँकेतील पैशांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. सुरुवातीला पोलिसांकडून यासंदर्भात तक्रारी घेण्यात आल्या नाहीत. मात्र रात्री उशीराने यासंदर्भातील तक्रारी पोलिसांनी दाखल करून घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान केंद्र प्रमुखाच्या मदतीनेच अनेक ठिकाणी बोगस मतदान पार पडत असल्याचे आणि त्यास संबधित अधिकारी सहकार्य करतानाचे आणि या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याकडून संबधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

Check Also

अजित पवार यांचे आश्वासन, फुले वाडा व क्रांतीज्योती फुले यांच्या स्मारक विस्तारासाठी २०० कोटी जुलै अखेरीस भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन- मंत्री छगन भुजबळ

महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *