Breaking News

शरद पवार यांचा इशारा, सरकारला जागं करतोय, अन्यथा आम्हाला इतर पर्याय… पाणी साठा सर्वात कमी

राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील महायुती सरकारवर केला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत आज बोलत होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यामध्ये पावसाची स्थिती गंभीर आहे. राज्यामध्ये एकूण १९ जिल्हे त्यातले ४० तालुके गंभीर दुष्काळग्रस्त आहेत तर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ सोळा तालुक्यात आहे. एकंदरीत विचार केला तर ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रात जून अखेरपर्यंत राहिल्यास राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण होण्याची शक्यता वर्तविली.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, तसेच राज्यात भीषण दुष्काळ आहे त्या ठिकाणी मागणीपेक्षा कमी पाणी पुरवठा होत असल्याने लोकांची वणवण होत आहे. महाराष्ट्रात एकंदर २ हजार ९२ मंडळ आहेत यातले पंधराशे मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विशेष विचार केला तर मराठवाड्यामध्ये आणि पुण्यातील काही भागात गंभीर परिस्थिती आहे. देशभरात सर्वाधिक धरणे महाराष्ट्र राज्यात आहेत. परंतु यातल्या पाणी साठ्याचा विचार केला तर गंभीर परिस्थिती असल्याचे स्पष्ट केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मराठवाड्यात ४० महत्वाची धरणे आहेत. परंतु या विभागात फक्त १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या विभागासह अशीच परिस्थिती अनेक जिल्ह्यांची आहे छत्रपती संभाजी नगरला ८१ लघु प्रकल्प आहेत इथे फक्त सहा टक्के पाणी शिल्लक आहे. पुण्यामध्ये पन्नास प्रकल्प आहेत या भागात फक्त २४ टक्के पाणी शिल्लक असल्याचे सांगितले.

मराठवाड्यातील पाणी प्रश्नाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पामध्ये ५.५० इतकाच जलसाठा शिल्लक आहे तर अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर या मोठ्या प्रकल्पामध्ये पाच टक्क्यांहून खाली पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यात हीच परिस्थिती जून अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होण्याची शक्यता असल्याची चिंताही यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळाबाबत मराठवाड्यात आयोजित आढावा बैठकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, कृषीमंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु कृषी मंत्रीच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दुष्काळाच्या कालच्या बैठकीला हजर नसतील तर ही गंभीर बाब आहे. या सगळ्याकडे सरकारमधील फक्त दोनच पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहत असतील तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेणे गरजेचे असे मतही यावेळी व्यक्त केले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, राज्य सरकारला आम्ही माध्यमांच्या मार्फत जागे करण्याचे आवाहन करत आहे, हे करूनही सरकारने काही उपाययोजना केल्या नाहीत तर आम्हाला इतर पर्याय आहेत असा सूचक इशारा देत छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र, पुणे विभागतील परिस्थिती चिंताजनक आहेत. मोठ्या धरणांमध्ये संभाजीनगरमधील धरणांमध्ये १० टक्के पाणी आहे. तर, पुणे विभागातील धरणांमध्ये ३५ टक्के, नाशिकमधील धरणांमध्ये टक्के २२ पाणी आहे.’, या भागात किती टँकर सुरू आहेत? याची आकेडवारीच यावेळी शरद पवारांनी वाचून दाखविली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मे महिन्याच्या शेवटाकडे आपण आहोत, पण जूलैपर्यंत हीच स्थिती असणार आहे. पाऊस पडतो, पण धरणं भरण्यासाठी वेळ लागतो. संभाजीनगरमध्ये १८६७ पाण्याचे टँकर लागत आहेत. वेळीच लक्ष दिलं नाही तर स्थिती गंभीर होईल. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पुण्यामध्ये ६३२ गाव आणि वाड्यामध्ये ७५५ टँकर सध्या लागत आहेत, राज्यात यंदा १०, ५७२ टँकर लागत आहेत, मागील वर्षी १,१०८ टँकर लागत होते. यावरुन स्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. जनावरांच्या चाऱ्याची आवश्यकता आहे. राज्यात अनेक ठिकाणी चारा छावण्यांची मागणी करण्यात येत आहे. संभाजीनगर आणि पुण्यामध्ये दुष्काळी काम काढणं, किंवा रोजगार हमीचे कामं काढणं आवश्यक आहे, अशी भूमिकाही यावेळी स्पष्ट केली.

Check Also

अजित पवार यांचे आश्वासन, फुले वाडा व क्रांतीज्योती फुले यांच्या स्मारक विस्तारासाठी २०० कोटी जुलै अखेरीस भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन- मंत्री छगन भुजबळ

महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *