Breaking News

विजय वडेट्टीवार यांची मागणी, पुणे नंतर आता नागपूरात ड्रंक अँड ड्राईव्ह, कडक कारवाई करा आरोपीच्या गाडीत दारूच्या बाटल्या आणि अंमली पदार्थ

पुणे येथील कल्याणीनगर येथे दाऊ पिऊन पोर्शे कार सुसाट चालवित दोघांचा निष्पाप बळी घेतल्याचे प्रकरण अद्याप ताजे असताना आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरातच आणखी एक ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत गृहमंत्री कारवाईची एक्सद्वारे मागणी केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुणे नंतर काल नागपूर येथे सुद्धा ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण घडले आहे. अपघातातील आरोपींच्या गाडीत दारूच्या बाटल्या आणि अमली पदार्थ असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ड्रग सहज उपलब्ध होत असल्याबाबत मुद्दा मागील अधिवेशनात आम्ही मांडला होता. वारंवार प्रश्न उपस्थित करून सरकारचे आणि गृह विभागाचे लक्ष याकडे वेधले. त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याची टीकाही यावेळी केली.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, इतरवेळी ट्रॅफिक पोलिस अलर्ट असतात मग दारू पिऊन, ड्रग सेवन करून गाडी चालवणाऱ्या बेधुंद आरोपींकडे पोलिसांचे लक्ष नाही का? की कायदा आणि नियम फक्त सामान्य माणसांना छळण्यासाठी आहे ? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपध्दतीवर टीका करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मागील २ वर्षात नागपूर क्राईम कॅपिटल म्हणून ओळखली जाते आहे. त्यात असे अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याने सामान्य नागरिकांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण झाला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनांना गांभीर्याने घेऊन कठोर कारवाई करावी ही आमची मागणी असल्याचेही यावेळी म्हणाले.

https://x.com/VijayWadettiwar/status/1794302690488430874

Check Also

अजित पवार यांचे आश्वासन, फुले वाडा व क्रांतीज्योती फुले यांच्या स्मारक विस्तारासाठी २०० कोटी जुलै अखेरीस भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन- मंत्री छगन भुजबळ

महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *