Breaking News

आत्मनिर्भर अर्थसंकल्पातील जाणून घ्या महत्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या या घोषणा

नवी दिल्ली : प्रतिनिधी

आरोग्य क्षेत्र-

– नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटी रुपयांची तरतूद

– प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारणीसाठी तरतूद
– १५ अत्यावश्यक आरोग्य केंद्र आणि २ मोबाईल हॉस्पिटलची घोषणा
– आरोग्य क्षेत्रासाठी २ लाख २३ हजार ८४६ कोटींच्या निधीची तरतूद
– कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद

– गरज पडल्यास सरकार कोरोना लसीकरणासाठी आणखी निधी मंजूर करणार

जून्या वाहनांसाठी योजना
– १५ वर्षे जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी

गुंतवणूक व नव्या पायाभूत सुविधा

– देशभरात ७ मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क उभारणार
– कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १ लाख ७८ हजार कोटींचा निधी
– डीएफआयसाठी ३ वर्षांकरिता ५ लाख कोटींच्या निधीची तरतूद
– दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाइपलाईनचा विस्तार करणार
– कापड उद्योगासाठी आवश्यक सर्व सुविधांसह येत्या ३ वर्षात ७ टेक्स्टाईल पार्कची निर्मिती
– रस्ते विभागासाठी १ लाख १८ हजार कोटींचा निधी
– मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद
– २०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य डोळ्यासमोर
– रेल्वेसाठी १ लाख १० हजार ५५ कोटींच्या निधीची तरतूद
– २०३० पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजना राबवणार

– सार्वजनिक वाहतुकीतल्या बसेसची सुधारणा करण्यासाठी १८ हजार कोटी
– नाशिक मेट्रो फेज-१ आणि नागपूर मेट्रो फेज- २ ची घोषणा
– नाशिकसाठी २ हजार ९२ कोटी आणि नागपूरसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद

– पश्चिम बंगालमध्ये कोलकाता-सिलिगुडी राष्ट्रीय महामार्गाची घोषणा

-सार्वजनिक वाहतुकीतल्या बसेसची सुधारणा करण्यासाठी १८ हजार कोटी

– रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी १,१८,१०१ कोटींची तरतूद

निर्गुंतवणूक अर्थात कंपन्यांची विक्री-

– विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मर्यादा ४९ वरून ७४ टक्क्यांवर
– सरकारी बँकांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद
– या वर्षी एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार
– बीपीसीएल,एअर इंडिया, पवनहंस, आयडीबीआयची निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करणार
– १३ क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीमधून १ लाख ७५ हजार कोटींचा निधी उभारणार

 

कृषी-शेतकरी
– शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दिष्ट
– गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरिता तरतूद

– शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दिष्ट
– गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरिता तरतूद
-१६.५ लाख कोटी कृषी कर्ज वाटप करण्याचं उद्दिष्ट
– १ हजार कृषी बाजारपेठा ऑनलाईन यंत्रणेशी जोडणार

इतर महत्वाच्या योजना

– असंघटित मजुरांसाठी ऑनलाईन पोर्टल निर्माण करणार

– १०० नवीन सैनिक स्कूलची घोषणा
– सर्व क्षेत्रात सर्व पदांवर महिलांना नोकरी करता यावी म्हणून प्रयत्न
– आदिवासी भागात ७५० ‘एकलव्य’ शाळा उभारणार
– पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेसाठी ६४ हजार कोटींची तरतूद
– लहान सिंचन प्रकल्पांसाठी ५ हजार कोटींची तरतूद
– गगनयान मिशन डिसेंबर महिन्यात सुरु करणार
– ५ वर्षात सागर मिशन अंतर्गत अभूतपूर्व संशोधनाचं लक्ष्य
– डिजिटल जनगणनेसाठी ३ हजार कोटींपेक्षा जास्त तरतूद
– समुद्र संशोधन करण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद
– देशभरातील सर्व शहरी स्थानिक संस्थांमध्ये जल जीवन मिशन राबवण्यात येणार असून या महत्त्वकांक्षी योजनेसाठी २.८७ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

– सरकारला ८० हजार कोटींच्या निधीची गरज; ८० हजार कोटींचा निधी जमा करण्यासाठी अनेक योजना
– उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १ कोटीने वाढवणार
– लघु उद्योगांसाठी १५ हजार ७०० कोटींची तरतूद
– लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ उभारणीची घोषणा
– देशात उच्च शिक्षण आयोगाची निर्मिती, त्यासाठी कायद्यात सुधारणा करणार
– सौदी अरेबिया आणि जपानच्या मदतीने स्किल ट्रेनिगवर काम सुरु
– ३ वर्षात ५ लाख कोटींचा निधी उभारण्यासाठी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूटशनची स्थापना करणार

 

Check Also

टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क यांचा अचानक चीन दौरा भारताबरोबरील चर्चा पुढे ढकलल्यामुळे केला अचानक चीन दौरा

भारताचा दौरा पुढे ढकलल्यानंतर काही दिवसांनी, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क अचानक भेट देण्यासाठी चीनला जात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *