Breaking News

जाणून घ्या काय स्वस्त होणार? काय महागणार? तर ज्येष्ठ नागरीकांना करातून सूट-केद्रिय अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली : प्रतिनिधी

आयात इलेक्ट्रॉनिक वस्तुंवरील कस्टम ड्युटीमध्यें वाढ करण्यात आल्याने मोबाईल, चार्जर महाग होणार आहे. तर मेड इन इंडिया या संकल्पनेला चालना देण्यासाठी देशातंर्गत तयार झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तु स्वस्त होणार आहेत. त्याचबरोबर वाहनांच्या सुट्या भागांवरही कस्टम ड्युटी १५ टक्क्याने वाढविल्याने वाहनांचे स्पेअर पार्ट महागणार आहेत. याशिवाय अल्कोहोलिक बिव्हरेजवर अग्रो इन्फ्रा हा १०० टक्के कर लावण्यात आल्याने आता दारू आणि बिअर ही महागणार आहे. तर पेट्रोलवर २.५ टक्के तर डिझेलवर ४ रूपयांचा कृषी सेस अधिभार लावण्यात आल्याने या दोन्ही गोष्टी महागणार आहेत.

याशिवाय देशात आयात होणाऱ्या सोने-चांदींवरील कस्टम ड्युटीत २.५ टक्के घट करण्यात आली आहे. त्यामुळे सोने स्वस्त होणार आहे. तर ७५ वर्षावरील ज्येष्ट नागरीकांना आयकरातून पूर्णत: सूट देत त्यांना आयटी रिटर्न भरण्याची गरज नसल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी जाहिर केले.

याशिवाय स्टार्ट अपखाली कर्ज घेतलेल्या युवकांना आणखी एक वर्ष व्याजातून भरण्यापासून सवलत देण्यात आली आहे. तर कार्पोरेट क्षेत्रांना कर सवलत देत दुसऱ्याबाजूला सर्वच क्षेत्रात किमान वेतन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व खाजगी व्यवस्थापनांना आपल्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावे लागणार आहे. याशिवाय स्वत: दरातील घरांसाठी आकारण्यात येणाऱ्या करातही आणखी एक वर्षाची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे वर्षभरात सर्वसामान्य घर घेणाऱ्या ग्राहकांवर अतिरिक्त बोजा पडणार नाही.

 

Check Also

Razorpayनेही आता एअरटेलबरोबर जारी केले युपीआय स्वीच कंपनीने जारी केलेल्या पत्रकातून माहिती

फिनटेक Fintech युनिकॉर्न रझोरपे Razorpay ने आज सांगितले की ते स्वतःचे UPI इन्फ्रास्ट्रक्चर लाँच करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *