मुंबई: प्रतिनिधी
बॉलीवूड स्टार सुशांतसिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत आले. मात्र या पथकात असलेले पोलिस अधिक्षक विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यास सांगितल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. त्यामुळे अखेर महाराष्ट्र पोलिसांनी सदर पोलिस अधिक्षकांना गोरेगांव येथील एसआरपीएफमधील सदनिका उपलब्ध करून देत चौकशीच्या कामासाठी फिरण्यासाठी एका वाहनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महासंचालक कार्यालयाने ट्विटरवरून दिली.
राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. दरम्यान याप्रकरणी बॉलीवूडमधील जवळपास ५० हून अधिक जणांचे जबाब नोंदवून झाले आहेत. तसेच याप्रकरणी रोज नवनवी माहिती पुढे येत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढत चालले आहे. त्यातच रजपूतच्या वडीलांनी कोट्यावधी रकमेचे अपहार झाल्याचा आरोप केल्याने याप्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. त्यातच भाजपाकडून सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केलेल्या काळात सेलिब्रेटी पार्ट्यांचे आयोजन होत असल्याचा आरोप करत यातील एका पार्टीला राज्य मंत्रिमडळातील मंत्री आणि अधिकारी उपस्थित असल्याचा दावा केला.
त्यामुळे याप्रकरणाला वेगळेच वळण लागण्यास सुरुवात झाली. त्यातच याप्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेल्या बिहारच्या पोलिस पथकातील एसपी तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केले. याप्रकरणी पटनाचे एसएसपी उपेंन्द्र कुमार शर्मा यांनी आज दुपारी पोलिस महासंचालकांशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर एसपी तिवारी यांना गोरेगांव येथील एसआरपीएफ कॅम्पमधील एक सदनिका उपलब्ध करून देत चौकशीसाठी वाहनही उपलब्ध करून दिले.
तिवारी यांना होम क्लारंटाईन केल्याने मुंबई पोलिस विरूध्द बिहार पोलिस असा संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले. याशिवाय तपासप्रकरणावरून बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची थोडीशी शाब्दीक चकमकही उडाली होती.
Upon the request of SSP Patna Upendra Kumar Sharma, IPS, SP Central City Patna Vinay Tiwari has been provided accommodation at SRPF Goregaon since Worli Police Mess is closed due to COVID situation
A vehicle has also been arranged for SP Tiwari who is in Mumbai for investigation
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) August 3, 2020