Breaking News

चांदनी गर्ल श्रीदेवीची पडद्यावरून एक्झीट हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन

मुंबई : प्रतिनिधी

आपल्या अभिनयाच्या आणि लावण्याच्या जोरावर हिंदी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आणि पहिली सुपरस्टार अभिनेत्री म्हणून नावाजलेल्या श्री अम्मा यंगर अय्यपन अर्थात श्रीदेवीचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झाले. पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी सोबत नातेवाईकांच्या लग्नासाठी दुबईत गेली असता रात्री उशीरा श्रीदेवीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्या ५४ वर्षाच्या होत्या.

त्यांचे पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार असून दुपारी १२ ते २ वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव खाजगी विमानाने आणण्यात येणार असल्याची समजते.

श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ साली झाली. वयाच्या ४ थ्या वर्षी थुवैमन या तामिळ चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर आगमन केले. तर ८ व्या वर्षी अर्थात १९७३ साली मल्याळम चित्रपट पुम्बाता मधील बालकलाकाराच्या भूमिकेबद्दल केरळ सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला. तर १९७५ साली ज्युली या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्याआधी त्यांनी मल्याळम्, कन्नड, तामीळ आधी चित्रपटात काम केले.

मात्र श्रीदेवीचे हिंदी चित्रपटसृष्टीतील खरे आगमन झाले ते सोलवा सावन या चित्रपटाद्वारे. त्यानंतर त्यांचे अनेक चित्रपट आले आणि त्यातील बहुतांष सुपरहिटही ठरले. विशेषत: सदमा, नगिना, चांदनी, लम्हे, मिस्टर इंडिया या चित्रपटाद्वारे त्यांनी केलेला अभिनय वाखाणण्याजोगा राहीला. तसेच हे सर्व चित्रपट केवळ श्रीदेवीचा अभिनयासाठीच पाहिले जातात.

इंग्लीश-विग्लीष या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी रूपेरी पडद्यावर पुनरागमन केले. त्यातील त्यांच्या अभिनयाचीही मोठ्या प्रमाणावर प्रशंसा झाली. त्यानंतर त्यांचा मदर हा चित्रपट आला आणि तो त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

त्यांच्या निधनाने बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील पहिली अभिनेत्री सुपरस्टार गेल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच महानायक अमिताभ बच्चन, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी श्रध्दांजली वाहीली.

शोक

अष्टपैलू अभिनेत्री गमावली

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक अष्टपैलू अभिनेत्री आपण गमावली आहे. ‘वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेल्या श्रीदेवी यांनी गेल्या अर्धशतकी कारकीर्दीत हिंदीसह विविध भाषांमधील चित्रपटांतून अतिशय वैविध्यपूर्ण भूमिका तितक्याच समर्थपणे  साकारल्या होत्या. विशेषत: सदमा, चांदणी, लम्हें यासारख्या चित्रपटांपासून ते अलीकडच्या इंग्लिश विंग्लिशपर्यंतच्या  अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका निश्चितच दीर्घकाळ स्मरणात राहतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

श्रीदेवीचे एक्झीट चटका लावून जाणारी

रूपेरी पडद्यावर तीन दशके अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवीचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून धक्का बसला आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेत्रीचे असे जाणे मनाला चटका लावून जाणारे आहे. ती खऱ्या अर्थाने चित्रपटातील सुपरस्टार होती.

राज्यपाल सी.विद्यासागर

श्रीदेवी या चांदनी नव्हे तर तारा

हिंदी चित्रपटातील सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. त्या खऱ्या अर्थाने चांदनी नव्हे तर चित्रपटसृष्टीतील तारा होत्या. असंख्य भूमिका आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी जीवंत आणि अविस्मरणीय केल्या. चाहत्यांच्या त्या कायम स्मरणात राहतील.

विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील

(काल रात्री श्रीदेवी आणि कुटुंबियांचे काही खास फोटो)

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *