Breaking News

रोहित शेट्टीच्या मराठी सिनेमाचं शूटिंग सुरू स्कूल कॅालेज आणि लाईफ

मुंबई : प्रतिनिधी

धडाकेबाज अॅक्शनपटांसोबतच हलके-फुलके विनोदी सिनेमे बनविण्यासाठीही प्रसिद्ध असलेला निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीही अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार यांच्या पावलावर पाऊल टाकत मराठीकडे वळला आहे. रोहित एका मराठी सिनेमाची निर्मती करणार असल्याची चर्चा मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, पण रणवीर सिंहसोबतच्या ‘सिम्बा’मध्ये व्यग्र असल्याने या सिनेमाचा शुभारंभ करण्यात आला नव्हता. रोहितच्या या मराठी सिनेमाचं शीर्षक ‘स्कूल, कॅालेज आणि लाईफ’ असं आहे.

रोहित शेट्टी पिक्चर्सची निर्मिती असलेल्या ‘स्कूल, कॅालेज आणि लाईफ’चा मुहूर्त नुकताच करण्यात आला. कटिंग क्रू फिल्म्स आणि पवित्रा गांधी फिल्म्ससोबतच रोहित या सिनेमाची निर्मिती करीत आहे. रीतसर पूजा-अर्चा करून ‘स्कूल, कॅालेज आणि लाईफ’च्या चित्रीकरणाला शुभारंभ करण्यात आला आहे. या सिनेमात चार कॅालेजकुमारांची कथा पाहायला मिळेल. मुख्य भूमिकेतील सर्व चेहरे नवीन असून या सिनेमात दोन अभिनेत्रीही दिसणार असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं.

‘स्कूल, कॅालेज आणि लाईफ’चं दिग्दर्शन विहान सूर्यवंशी हा नवोदित दिग्दर्शक करीत आहे. विहानने यापूर्वी दिग्दर्शक नागेश कुकूनूरसोबत ‘८ x १० तस्वीर’, ‘आशाएं’, ‘बॅाम्बे टू बँकॅाक’ या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शन केलं आहे. याखेरीज ‘अ माइटी हार्ट’ आणि ‘वन नाइट विथ द किंग’ या हॅालिवुडपटांसाठीही विहानने सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे. लाईफ ओके वाहिनीवरील ‘पुकार’ या मालिकेचं दिग्दर्शनही विहानने केलं आहे. पदार्पणातच रोहितसारख्या दिग्दर्शकाने विश्वास दाखवून दिग्दर्शनाची संधी दिल्याने विहान खूप आनंदी आहे. खरं तर यापूर्वीच रोहितची पावलं मराठीकडे वळणार होती, पण काही गोष्टी नीट जमून न आल्याने ते साध्य होऊ शकलं नव्हतं. ‘स्कूल, कॅालेज आणि लाईफ’च्या निमित्ताने रोहितची इच्छाही पूर्ण झाली असंही म्हणता येईल.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *