चेन्नई : प्रतिनिधी
तेलगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गोड गळ्याचे आणि मुलायम आवाजाचे पार्श्वगायक एस.पी.बालसुब्रम्यन्म यांचे कोरोनामुळे रात्री उशीरा निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. मागील दोन महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर येथील एका रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनावर मात करून घरी सोडण्यात आले होते. परंतु त्यांची तब्येत खालावल्याने एसपीना पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले. मात्र रात्री प्रसिध्द दोन महिने कोरोनावरील उपचार घेवून बालसुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होते. मात्र रात्री उशीरा त्यांचे निधन झाले. आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांनी आतापर्यत ४० हजार गाणी गायली आहेत. एसपी बालसुब्रमण्यम हे ९० च्या दशकातील सलमान खानचा आवाज म्हणून ओळखले जायचे. जवळपास एका दशकाहून अधिक काळ त्यांनी सलमानसाठी गाणी गायली. मैने प्यार किया या चित्रपटातील दिल दिवाना या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा उत्कृष्ट गायकाचा पुरस्कारही मिळाला. एस.पी.बालसुब्रमण्यम यांचा जन्म ४ जून १९४६ रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लूर येथे झाला. १५ डिसेंबर १९६६ रोजी त्यांनी श्री श्री श्री मर्यादा रामण्णा या तेलगू चित्रपटाद्वारे पार्श्वगायक म्हणून पदार्पण केलं. १९६९ मध्ये त्यांना आपलं पहिलं तामिळ गाणं रकॉर्ड करण्याची संधी मिळाली. एयर्कई एन्नुम इलाया कन्नी असं ते गाणं असून यात तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार जेमिन गणेशनदेखील होते. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या संकराभारनाम या चित्रपटातून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. या चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
यानंतर बालसुब्रमण्यम यांना दक्षिणेकडील स्टार एमजीआरच्या इरम निलावे वा या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. या चित्रपटात जयललितादेखील मुख्य भूमिकेत होत्या. पण दुर्दैवाने रेकॉर्डिंगपूर्वी बालसुब्रमण्यम यांना टायफॉईड झाला. यामुळे ते निराश झाले. परंतु एमजीआर मागे हटले नाहीत. टायफॉयडमधून बरे होऊन ते परत येईपर्यंत एमजीआर यांनी चित्रीकरण पुढे ढकलण्याचा आणि त्यांनाच गाण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला. ते यातून बरे झाल्यानंतर जयपूरमध्ये चित्रीकरण झालेलं हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. त्यांनी आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत तेलुगु, तामिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम अशा चित्रपपटांमध्ये ४० हजार गाणी गायली. कन्नड संगीतकार उपेंद्र कुमार यांच्यासाठी त्यांनी १२ तासांमध्ये २१ गाणी स्वरबद्ध केली. यासाठी त्यांचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल़्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं.
अनेकदा बालसुब्रमण्यम यांनी एकावेळी अनेक भाषांमध्ये १६-१७ गाणीही स्वरबद्ध केली आहेत. अनेकदा त्यांनी १७ तास सलगही गाणी गायली आहेत. १९९२ मध्ये बालसुब्रमण्यम यांनी ए.आर.रेहमान यांच्यासोबत रोजा या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं. रोजा हा चित्रपट तिनही भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. त्या सर्वांसाठी त्यांनी गाणी गायली होती. तसंच यानंतर दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं. बालसुब्रमण्यम हे उत्कृष्ट गायक तर होतेच. परंतु याव्यतिरिक्त त्यांनी तामिळ, तेलुगु, कन्नड आणि हिंदी भाषेतील ४० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीतही दिलं होतं. ९० च्या दशकात जेव्हा ते सलमान खानचा आवाज म्हणून ओळखले जायचे तेव्हा त्यांनी यातून ब्रेक घेतसा. त्यांना पूर्णवेळ अभिनेता होण्याचीही इच्छा होती. त्यानंतर त्यांनी ७२ चित्रपटांमध्ये अभिनयही साकारला होता. १५ वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांनी २०१३ मध्ये गायक म्हणू चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटातीस गाणं स्वरबद्ध केलं. २०११ मध्ये त्यांना पद्भभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.
#ripspb …Devastated pic.twitter.com/EO55pd648u
— A.R.Rahman (@arrahman) September 25, 2020
Heartbroken to hear about #SPBalasubrahmanyam sir… you will forever live on in your undisputed legacy of music! condolence to the family #RIP
— Salman Khan (@BeingSalmanKhan) September 25, 2020