Breaking News

तेजश्री बनली आरजे ‘असेही एकदा व्हावे’ या आगामी सिनेमात दिसणार आरजेच्या भूमिकेत

मुंबई : प्रतिनिधी

सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रेडीओ स्टेशन्सवर रेडीओ जॅाकी म्हणजेच आरजेंसोबत गप्पा मारणाऱ्या कलाकारांनाही आरजे बनण्याचा मोह आवरता येत नाही. नॅान-स्टॅाप बडबड करीत समाजातील वर्तमान काळातील घटनांसोबतच भूतकाळाचाही वेध घेण्याची कला असणारे आरजे बनून आपणही श्रोत्यांचं मनोरंज करावं असं बऱ्याच कलाकारांना वाटत असतं, पण त्यांचं हे स्वप्न केवळ रुपेरी पडद्यावरच साकार होतं.

आजवर बऱ्याच अभिनेत्रींनी आरजेंच्या भूमिकेत रसिकांची दाद मिळवली आहे. ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये विद्या बालनने साकारलेली आरजे जान्हवी हे यातील सर्वात यशस्वी उदाहरण मानलं जातं. विद्याच्या अगोदर आणि नंतरही बऱ्याच अभिनेत्रींनी आरजेच्या भूमिका साकारल्या, पण विद्याने साकारलेली जान्हवी कायम स्मरणात राहणारी ठरली. मोठ्या पडद्यावरील या जान्हवीच्या पावलावर पाऊल टाकत मोठ्या पडद्यावरील म्हणजेच ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानही आता आरजे बनली आहे.

झेलू एंटरटेनमेन्टस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘असेही एकदा व्हावे’ या आगामी सिनेमात तेजश्री आरजे बनल्याचं पाहायला मिळेल. या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच ती उमेश कामतसोबतही दिसणार आहे. ६ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील भूमिकेसाठी तेजश्रीने कसून अभ्यास केला. त्यासाठी तिने एक महिना आरजेचं खास वर्कशॉप प्रशिक्षण घेतलं. आरजेंचं बोलणं, श्रोत्यांसोबतचा त्यांचा संवाद, लकबी, शब्दांचे उच्चार, त्यांचा हजरजबाबीपणा, तसंच विषय खेळवत ठेवण्याची किमया, आणि गाण्यांद्वारे केलं जाणारं श्रोत्यांचं मनोरंजन या सर्व गोष्टी तेजश्री या वर्कशॉपमध्ये शिकली. त्यासाठी तिने रेडीओ स्टेशनला भेट देखील दिली. तिथे काम करत असलेल्या आरजेंच्या कामाचं जवळून निरीक्षण करत आणि संवाद साधत आपल्या व्यक्तिरेखेत प्राण ओतले.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *