Breaking News

अभिनेत्री केतकी चितळेने पोस्ट केली पवारांवर खालच्या पातळीवर टीका करणारी कविता सर्व मानसिक दिवाळखोरीवर दाखविणारे भाष्य

राज्याच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रात वावरणाऱ्या अनेकांकडून एखाद्या राजकिय नेत्यांबद्दल व्यक्तीश टीका केल्याचे फारसे ऐकिवात नाही. मात्र त्या राजकीय नेत्यांच्या वैचारीकतेशी काही मतभेद असतील त्यास वैचारीक पध्दतीने टीका-टीपण्णी करत व्यक्त करण्यात येते. या अनुषंगाने राज्यात यापूर्वी वैचारीक मतभेदाचे वाद अनेकदा राज्यालाही पाह्यला मिळाले. मात्र एखाद्या राजकिय नेत्याच्या आजारपणावरून वैयक्तीक टीका करत त्यास थेट नरकात जा म्हणण्याइतकी बौध्दीक दिवाळखोरी आतापर्यत कोणत्याही अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने व्यक्त केली नाही. मात्र मराठी दूरचित्रवाणीवरील काही सिरीयलमध्ये काम करत असलेल्या केतकी चितळे अभिनेत्रीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अंत्यत खालच्या आणि वैयक्तिक पातळीवर व त्यांच्या आजारपणावर टीका करणारी एक कविता पोष्ट केली. त्यामुळे राज्यात चितळे हीच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला आहे.

केतकी चितळे हीने ज्या व्यक्तीची कविता शेअर केली आहे तो कोणीतरी अॅडव्होकेट नितिन भावे नामक आहे. त्याने शरद पवारांच्या आजारपणावरून ही कविता केली असून शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष भ्रष्टाचाराचेही आरोप या कवितेतून केले. याशिवाय पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचाही उल्लेख अप्रत्यक्ष केला. याशिवाय शरद पवारांना नरकात जाण्याबद्दलची अपेक्षाही व्यक्त केली.

२१ व्या शतकात एखाद्या व्यक्तीबद्दलची टोकाची भूमिका असली तरी त्या व्यक्तींबद्दल जाहिरपणे त्यांच्या वैयक्तिक आजारपण आणि इतर गोष्टींवर कधीच कोणी भाष्य करत नाही. तसेच असे बोलणे सुसंस्कृत समाजाचे लक्षण मानले जात नाही. मात्र अशा पध्दतीची वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर भाष्य करणारी कविता केतकी चितळे यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केली. त्यामुळे त्यावरून तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

दरम्यान केतकी चितळे यांनी पोस्ट केलेल्या या कवितेप्रकरणी त्यांच्यावर कळव्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष स्वनिल नेटके यांच्यासह कार्यकर्त्यांच्या तक्रार केली होती. त्यानुसार कळवा पोलिसांनी केतकी चितळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

केतकी चितळेने पोस्ट केलेली हीच ती कविता:

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *