Breaking News

अभिनय आणि लेखणीतून हिंदी चित्रपटसृष्टी समृध्द करणारे कादर खान यांचे निधन

कँनडा येथील रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी

हिंदी, मराठी भाषिक सिनेरसिकांना आपल्या अभियाच्या माध्यमातून कधी हसायला लावणारे तर कधी खलनायकाच्या भूमिकेतून भीती निर्माण करणारे आणि लेखनीतून सर्वोत्तम पटकथा, संवाद लिहीणारे सुप्रसिध्द अभिनेता, लेखक कादर खान यांचे कँनडा येथे आज वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही वर्षांपासून ते आजारी असल्याने त्यांना कँनडा येथील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

कादर खान हे मुळचे अफगाणिस्तानातील काबूल येथे जन्म झाला. त्यांची वडील अब्दुल रेहमान खान हे कंदाहार येथील तर आई इक्बाल बेगम या पाकिस्तानातील बलुचिस्तान येथील होत्या. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले होते. तसेच सिव्हील इंजिनियर म्हणून शिक्षण झाले होते. त्यांनी आतापर्यंत तब्बल ३०० चित्रपटात अभियन केला. तर तब्बल २५० चित्रपटाचे संवाद आणि पटकथा लेखण केल. त्यांनी आपल्या काळातील सुपरस्टार राहिलेल्या राजेश खन्ना, जितेंद्र, गोविंदा, अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटात काम केले.

मनमोहन देसाई दिग्दर्शित आणि राजेश खन्ना अभिनित रोटी या चित्रपटाच्या लेखणासाठी त्याकाळी सर्वाधिक १ लाख २१ हजार रूपयांची बिदागी कादर खान यांना मिळाल्याची चर्चा हिंदी चित्रपटसृष्टीत होती. मेरी आवाज सुनो, अंगार या चित्रपटांच्या सर्वोत्तम संवाद लेखनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तर बाप नंबरी बेटा दस नंबरी या चित्रपटातील अभिनयाबद्दल सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.  

मध्यंतरी त्यांचा आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या दरम्यान झालेला वाद ही चांगलाच गाजला होता.       

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेता अनुपम खेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहीली.   

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *