Breaking News

रुपेरी पडद्यावर येणार ‘एक सत्य’ एक वास्तवादी चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला

मुंबई : प्रतिनिधी

मराठी सिनेसृष्टीत आज विविध विषयांवरील वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमा बनत असून अशा सिनेमांना जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मसालापटांच्या तुलनेत वास्तववादी सिनेमांना मराठीमध्ये जास्त चाहतावर्ग लाभतो. मराठी रसिक चाणाक्ष असल्याने काही दिग्दर्शकही त्यांची आवडनिवड ओळखून सिनेमाची कथा निवडतात. ‘एक सत्य’ हा आगामी मराठी सिनेमा याच वाटेने जाणारा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर एक सत्य मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आपल्या अंतरंगातल्या गोष्टींचा वेध घेत जगण्याच्या संवेदना उलगडून दाखवणाऱ्या ‘एक सत्य’ या वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच चित्रपटातील एका गीताच्या चित्रीकरणाने संपन्न झाला. ‘निर्झरा एन्टरटेंन्मेंट’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश गंगणे यांनी केले असून लेखन डॉ. दिनेश काळे यांचे आहे. मंदार चोळकर लिखित ‘जरा जरा अबोल तू…’ या प्रणयगीताचे चित्रीकरण नुकतेच मुंबईतील चित्रनगरीत पार पडले. डॉ. दिनेश काळे, सुकन्या सुर्वे, पूजा मळेकर या तिघांवर हे गीत चित्रीत आले. भगवंत नार्वेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताला वैशाली सामंत व ऋषिकेश रानडे यांचा स्वरसाज लाभला आहे.

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर, स्वप्नील राजशेखर यांच्यासह डॉ. दिनेश काळे, सुकन्या सुर्वे, पूजा मळेकर आदि कलावंताच्या या चित्रपटात भूमिका आहेत. ‘एक सत्य’ या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या वेगात सुरू आहे. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या लोकेशन्सवर या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. ठरलेल्या शेड्युलनुसार चित्रीकरण वेळेत पूर्ण करून पोस्ट प्रोडक्शनच्या कामाला गती देण्याचा दिग्दर्शक रमेश गंगणे यांचा मानस आहे.

 

 

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *