Breaking News

कृतीची अशीही सामाजिक बांधिलकी गरीब, अनाथांना कपड्यांचे वाटप करणार

मुंबई : प्रतिनिधी

तेलुगू आणि तमिळ सिनेमांमध्ये यश मिळवल्यानंतर दोन वर्षांपूर्वी विक्रम भट यांच्या ‘राज : रिबूट’ या सिनेमात इम्रान हाश्मीसोबत जोडी जमवत बॅालिवुडमध्ये दाखल झालेली अभिनेत्री कृती खरबंदा सध्या चांगलीच फॅार्मात आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या रत्ना सिन्हा यांच्या ‘शादी में जरूर आना’ या सिनेमात ती राजकुमार रावसोबत दिसली. याखेरीज ‘गेस्ट इन लंडन’ आणि ‘वीरे दी वेडींग’ या सिनेमांमुळे लाइमलाईटमध्ये आलेली कृती सध्या ‘यमला पगला दीवाना फिर से’ या सिनेमात मुख्य भूमिकेत असल्याने सध्या चर्चेत आहे. हिंदीसोबतच ती कन्नड सिनेमांमध्येही काम करतेय. थोडक्यात काय तर कृती सध्या चित्रीकरणात चांगलीच व्यग्र आहे. यातूनही सामाजिक बांधिलकी जपत कृतीने एका अनोख्या कार्यासाठी पुढाकार घेतला आहे.

विविध अग्रगण्य फॅशनेबल ब्रँड्ससाठी जाहिरात करणारी कृती आता सामाजिक कार्यासाठीही पुढे सरसावली असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं. एक ऑनलाइन पोर्टलवर लवकरच एक अनोखी जाहिरात तयार करणार आहे. या जाहिराती अंतर्गत ग्राहकांना आपले जुने कपडे देऊन नवीन कपडे खरेदी करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून जमा केलेले जुने कपडे गूंज नावाच्या एनजीओला दान करण्यात येणार आहेत. हे कपडे पुढे अनाथ तसंच गरजू लोकांपर्यंत मोफत पोहोचविण्यात येणार आहेत.

या कामात कृतीही सहभागी झाली आहे. कृतीला जेव्हा या कामाबाबत समजलं तेव्हा समाजिक बांधिलकी जपत तिनेही या कार्यासाठी समर्थन दिलं. यापुढे वापरात नसलेले आपले कपडे ती या एनजीओला दान करणार आहे. इतकंच नव्हे तर आपल्या मित्र-मैत्रीणींनाही ती हे सत्कार्य करण्यासाठी प्रबोधन करीत आहे. याखेरीज चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जिथे जिथे बोलण्याची संधी मिळेल तिथेही ती याबद्दल जनजागृती करणार असल्याचं कृतीशी संबंधित असलेल्या सूत्रांकडून समजतं. ग्लॅमरविश्वात वावरताना कृती करीत असलेलं हे कार्य इतर सेलिब्रिटीजसाठीही प्रेरणादायी ठरावं असं आहे. यातून गरजूंना मदत झाली तर समाजातील विषम परिस्थिती बदलण्यास थोड्या फार प्रमाणात नक्कीच हातभार लागेल.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *