आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात द काश्मीर फाईल्स हा चित्रपट दाखविण्यात आल्यानंतर या महोत्सवाचे ज्युरी इस्त्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपीड यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाला व्हल्गर चित्रपट संबोधत कोणाच्यातरी सांगण्यावरून आणि प्रचाराचा (प्रपोगंडा) भाग म्हणून बनविल्याची टीका केली. यावरून भारतात द काश्मीर फाईल्स चित्रपटाचे कलाकार अनुपम खेर व एका ज्युरींनी पत्रकार घेत परिषद लॅपीड यांच्यावर टीके केली. काश्मीर फाईल्स हा चित्रपट कसा उत्तम आहे याचे गुणगाण गायले.
त्यानंतर नदाव लॅपीड यांची आज इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीला आज मुलाखत दिली. त्यावेळी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात असलेल्या इतर ज्युरींची मते काय होती यावरही लॅपिड यांनी भाष्य केले.
तसेच लॅपीड यांच्या या वक्तव्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी याचा विरोध केला. इस्त्रायलचे मध्य-पश्चिम भारतातील राजदूत कोब्बी शोशानी यांनीदेखील लॅपिड यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हणत वादातून काढता पाय घेतला.
लॅपिड यांनी इतर ज्युरी मेंबर्सनी त्यांची स्टेटमेंट बदलल्याचा दावा केला आहे. ‘इंडिया टूडे’ या वृत्तवाहिनीशी बोलताना लॅपिड यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, की ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल केवळ त्यांचंच नव्हे तर इतर ज्युरीचंही सारखंच मत होतं.
लॅपिड म्हणाले, चित्रपट बघताना सगळे ज्युरी एकत्रच बसले होते आणि चित्रपट पाहून झाल्यावर त्यांची सुद्धा हीच प्रतिक्रिया होती. याचे माझ्याकडे पुरावेसुद्धा आहेत, पण मी समजू शकतो की कोणत्यातरी दबावाखाली येऊन किंवा भीतीपोटी त्यांनी त्यांची वक्तव्यं बदलली असतील.
इस्त्रायलमधील चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते लॅपिड या कार्यक्रमात चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना असे म्हणाले होते की, द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित झालो आहोत. हा चित्रपट म्हणजे त्रस्त करणार अनुभव आहे. हा चित्रपट आम्हाला व्हलगर (फालतू) तसेच प्रपोगंडा (प्रचारकी हेतूने बनवलेला) वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेचं आहे, असं लॅपिड म्हणाले होते.
#Israeli Filmmaker #Nadav Lapid, the jury head of the 53rd International #Film Festival of India criticised Vivek Agnihotri’s film ‘The #Kashmir Files,’ called it ‘vulgar propaganda.’ @medhanarmada @ravishndtv @_YogendraYadav pic.twitter.com/UsBBjcpmCa
— Manas Pattanaik | ମାନସ ପଟ୍ଟନାୟକ (@ManasRYS91) November 28, 2022