मुंबई-चंद्रपूर : प्रतिनिधी
उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राजस्थानमध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने बोलणी सुरु केली असून हे विद्यार्थी लवकरच राज्यात परतणार असल्याची माहिती दिली.
राजस्थानमधील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेले १८०० विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मदत व पुनर्वसन विभाग पूर्ण प्रयत्न करत आहे . कोटा येथे गेलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा निहाय माहिती तयार करून घेण्यात आली आहे. लवकरच महाराष्ट्र सरकार व राजस्थान सरकार यांच्या मदतीने सर्व विद्यार्थी सुखरुप घरी परत येतील याची हमी मी पालकांना देत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे या विद्यार्थ्यांचा राज्यात परतण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
