Breaking News

मी बोलणार ना, पण पाहुण्यांना जावू तरी द्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

पुणे : प्रतिनिधी

आज सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी संबधित कंपन्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर आणि उद्योगावर छापेमारी सुरुच ठेवली. यापार्श्वभूमीवर काही प्रसारमाध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी बोलणार ना, मला जी काही भूमिका मांडाणारच आहे. पण पहिल्यांदा सरकारी पाहुण्यांना जावू तरी द्या असे सांगत या छापेमारीला फारसे महत्व देत नसल्याचे त्यांनी एकप्रकारे सांगितले.

सध्या पाहुणे घरी आणि कार्यालयात आहेत. त्यांना त्यांचे काम करू द्या त्यांना मला दुखवायचे नाही. त्यामुळे त्या पाहुण्यांना गेल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचा अर्थमंत्री असल्याने कर भरण्याबाबत आपली स्पष्ट भूमिका असून कर भरलाच पाहिजे. या कराच्या पैशातूनच विकास कामे होतात. त्यामुळे माझ्याशी संबधित कंपन्या असतील किंवा इतर व्यक्ती त्यांनी कर भरलाच पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचा पुर्नरूच्चार करत आयकर विभागाला कोणत्याही व्यक्तीच्या घरावर किंवा कंपन्यावर धाडी टाकण्याचा अधिकारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील कारखाने कोणाच्या काळात सर्वाधिक विकले गेले, कशासाठी विकले गेले, किती किंमतीला विकल्या गेल्या कि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विकल्या गेल्या याची सर्व माहिती आणि कागदपत्रे आपल्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे काम करू द्या त्या नंतर मी माझी भूमिका मांडणार असून मी काय पळून जाणार आहे की काय? असा उपरोधिक सवाल करत मी स्पष्टवक्ता असल्याचे आणि काम करण्यात पारदर्शक ठेवत असल्याचे सगळ्यांना माहित असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर राज्यात भाजपाशिवाय सर्व राजकिय पक्षांनी एकत्रितपणे निवडणूका लढविल्या पाहिजेत आणि भाजपाला खड्यासारखं बाजूला केले पाहिजे असे सांगत आगामी निवडणूकांच्यादृष्टीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी आपण लवकरच चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *