Breaking News

गुगललाही आहे तुमच्या सुरक्षेची काळजी, जाणून घ्या नक्की काय करते गुगल टू स्टेप व्हेरिफिकेशनच्या सुविधेमुळे बँकींग व्यवहार सुरक्षित

मुंबई: प्रतिनिधी

बँकिंग तसंच आर्थिक देवाण-घेवाणीची सर्व कामं आता ऑनलाईन झाली आहेत. मात्र ऑनलाइन व्यवहारामुळे आर्थिक फसवणुकीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. सरकार आणि बँकांकडून लोकांना या ऑनलाईन फ्रॉडपासून काळ काळजी घ्यावी हे पण वारंवार सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रत्येकजण आता त्याबाबत काळजी घेत आहे.

आपण केवळ आपल्या ऑनलाइन सुरक्षेचीच काळजी करत नाही तर गुगलही याबाबत काळजी घेत आहे. गुगललाही वाटतं की आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य असावं. त्यामुळे गुगलने आपले टू स्टेप व्हेरिफिकेशन (2SV) आपल्या १५० दशलक्ष खातेदारांसाठी ऑटो इनेबल केलं आहे. गुगलच्या मते, सुरक्षेचा हा टप्पा तुमच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. यामुळे इतर कोणीही आपल्या खात्यात प्रवेश करू शकत नाही.

टू स्टेप व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्ही तुमचं खातं पूर्णपणे सुरक्षित करू शकता. टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी दोन टप्पे पार करावे लागतील. पहिल्या टप्प्यात तुम्ही तुमचा पासवर्ड एंटर करा आणि दुसऱ्या मध्ये तुम्हाला ओटीपी टाकावा लागेल. जर तुम्ही ओटीपी टाकला नाही तर तुम्हाला तुमच्या खात्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ओटीपी मिळवण्यासाठी तुम्ही एसएमएस, व्हॉइस कॉल किंवा मोबाईल अॅप वापरू शकता.

टू स्टेप व्हेरिफिकेशन चालू करणं खूप सोपं आहे. इथं आम्ही आपल्याला सांगत आहोत की आपण आपल्या खात्यात 2SV कसे लागू करू शकता. प्रथम तुम्हाला तुमचं गुगल खातं उघडावं लागेल. यानंतर नेव्हिगेशन पॅनेलमधील सुरक्षा पर्याय निवडा. यामध्ये आपल्याला signing in to Google वर जावं लागेल. त्यानंतर टू स्टेप व्हेरिफिकेशनवर क्लिक करावे लागेल आणि नंतर Get start वर क्लिक केल्यानंतर तुम्ही टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला ऑन-स्क्रीन सूचनांचे पालन करावे लागेल. संपूर्ण प्रक्रियेचे पालन केल्यानंतर, आपलं टू स्टेप व्हेरिफिकेशन केलं जाईल.

गुगलने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलं आहे की, २०२१ च्या अखेरीस आपल्या १५० दशलक्ष युजर्सचं टू स्टेप व्हेरिफिकेशन केलं जाईल. या व्यतिरिक्त २ दशलक्ष यूट्यूब क्रिकेट निर्मात्यांना देखील टू स्टेप व्हेरिफिकेशन चालू करावं लागेल. गुगलने म्हटलं की, कंपनीला आपले युजर्स सुरक्षित ठेवायचे आहेत. या पडताळणी प्रक्रियेद्वारे अकाऊंट वापरणारी व्यक्ती योग्य आहे आणि ती आपलंच अकाऊंट वापरत असल्याचं गुगलला समजतं.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *