Breaking News

पंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या कृषी खतांच्या किंमती कमी करा

मुंबई: प्रतिनिधी

देशात एकाबाजूला जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन लागू असताना सर्वसामान्य नागरीक, शेतकरी आदींना मदतीचा हात देण्याऐवजी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असलेल्या खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून शेतकरी वर्गाला आणि सर्वसामान्य नागरीकांना महागाईच्या खाईत लोटू पहात असल्याने हा निर्णय योग्य नसल्याचे सांगत ही भाववाढ तातडीने रोखण्याच्या अनुषंगाने निर्णयाचा पुर्नविचार करावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना ट्विटरच्या आणि पत्राद्वारे केली.

कोरोनामुळे देशातील अनेकांचे आधीच रोजगार गेलेले आहेत. विपणन व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्यातच आता शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या खतांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. मान्सूनच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय गैरवाजवी असून याचा थेट परिणाम मान्सूनपूर्व पेरणी आणि त्यानंतरच्या कृषी मालाच्या किंमती आणि उत्पादनावर होणारा असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

आधीच इंधन दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी आणि नागरीकांना या नव्या निर्णयामुळे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे केंद्राने घेतलेला हा निर्णय धक्कादायक असून केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचा फेरविचार करून हा शेतकऱ्यांसाठी असलेला कटू निर्णयाचा पुर्नविचार करून हा निर्णय तातडीने मागे घेवून शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

फडणवीसांच्या गतीमान सरकारच्या काळातील रखडलेल्या कृषि पुरस्कारांचा वितरण सोहळा १९८ शेतकऱ्यांचा होणार सन्मान! २ मे रोजी नाशिक येथे कृषि पुरस्कार प्रदान सोहळा

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतीमान कारभाराच्या काळात राज्यातील कृषि, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये …

Leave a Reply

Your email address will not be published.