Breaking News

कृषी

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे सव्वा लाख हेक्टर क्षेत्र बाधित कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. ११ जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गहु, हरभरा, ज्वारी, कांदा व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा समावेश आहे. …

Read More »

मराठवाड्यात दिवसभर गारपीट सुरूच वीज पडून एक व्यक्ती तर दोन जनावरे दगावली

औरंगाबाद: प्रतिनिधी मराठवाड्यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यात दिवसभर गारपीट सुरुच असून वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर दोन जनावरे दगावली आहेत. या संदर्भात गारपीटग्रस्त भागात वेगाने पंचनामे करण्यासाठी स्थळपाहणी सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सुत्रांनी दिली. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यातील ९० गावांत गारपीट …

Read More »

विदर्भ, मराठवाड्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने घातला धुमाकुळ नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांचे आदेश

जालाना / मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग, धुळे या भागात आज सकाळी गारपीट आणि अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सकाळी थोडाच वेळ पडलेल्या पावसात छोट्या दगडांच्या आकाराच्या गारांचा पाऊस बुलढाणा, जालना जिल्ह्यात पडला. तर इतर भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या …

Read More »

राज्य सरकारचे आदेश असतानाही तूर नाकारण्याच्या घटना शेतकऱ्यांनी तूर जाळून केला निषेध

औरंगाबाद : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा घोळ गेल्या वर्षी प्रमाणे यंदा देखील मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरु आहे. खरेदीची मर्यादा आणि दरामधील तफावत यामुळे शेतकऱ्यांचे खरेदी केंद्रावर खडके उडत आहेत. शुक्रवारी  औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर खरेदी केंद्रावर दहा शेतकऱ्यांनी आणलेली तूर चाळण न करता रिजेक्‍ट करण्यात आली. त्यामुळे संतप्त …

Read More »

कर्जमाफीच्या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज आकारल्यास कारवाई जुलै २०१७ पासून व्याज न आकारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुबंई: प्रतिनिधी शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेतंर्गत मंजुर केलेल्या कर्जखात्यांवर बँकानी ३१ जुलै २०१७ रोजी नंतर व्याज आकारणी करू नये अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज सर्व बँकांना दिले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, यापुर्वी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. तरी देखील जुलै २०१७ नंतर कर्ज खात्यांवर …

Read More »

पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम विनाविलंब मिळण्यासाठी ती थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी असे निर्देश कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबतच्या कार्यवाहीचा आढावा कृषीमंत्री फुंडकर यांनी आज घेतला. यावेळी अपर मुख्य सचिव विजय कुमार, सहसचिव आर. बी. घाडगे, विमा …

Read More »

आणि एका तरूण शेतकऱ्याचा मंत्रालयातील आत्महत्येचा प्रयत्न फसला पोलिसांच्या सतर्कतेमुळे सोलापूरच्या सदाशिव धावरेचे प्राण वाचले

मुंबई: प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्त्येचे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील तरूण शेतकऱ्याने मंत्रालयातच आत्महत्या करण्यासाठी विषाची बाटली सोबत घेवून मंत्रालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयातील पोलिसांनी सदर शेतकऱ्याकडून किटकनाशकाची बाटली काढून घेत त्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे मंत्रालयात येवून शेतकऱ्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसला. …

Read More »

शेतकऱ्यांचा पुन्हा सरकार विरोधात एल्गार कर, कर्जा और बिजली का बिल भी नही देंगेंचा शेतकरी समितीचा नारा

मुंबईः प्रतिनिधी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या हत्याराला घाबरत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र सात-आठ महिन्याचा अवधी उलटत नाही, तोच कर्जमाफीची यशस्वी अंबलबजावणी न करण्यात आल्याने आणि सरसकट कर्ज माफी, शेतीपूरक व्यवसाय, शैक्षणिक आणि सिंचनासंदर्भात काढण्यात आलेले कर्ज ही कर्जमाफीच्या निकषात बसवावे यासह अन्य प्रश्न पुन्हा राज्य सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन …

Read More »

कर्जमाफीच्या योजनेपासून अद्यापही ५० लाखाहून अधिक शेतकरी वंचित राज्य सरकारची घोषणा फसवी असल्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा करत देशातील सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र मुख्यमंत्र्यांचा दावा पूर्णत: खोटा असून आजही ५० लाखापेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफीपासून लांब असल्याचा आरोप कॉग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. राज्यातील कर्जमाफीत मंजूर झालेल्या ग्रीन यादीत ४७ लाख ४६ हजार २२२ शेतकऱ्यांचा समावेश असला …

Read More »

कृषी संजीवनी प्रकल्पासाठी जागतिक बँकेसोबत सांमज्यस करार मराठवाडा, विदर्भातील ५ हजार १४९ गावांसाठी २८०० कोटी मिळणार

मुंबई : प्रतिनिधी विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५ हजार १४९ गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पा’च्या अंमलबजावणी आराखडा आज अंतिम करत जागतिक बँकेसोबत सांमज्यस करार करण्यात आल्या.  नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत या प्रकल्प करारनाम्याच्या मसुद्यावर राज्य सरकार आणि जागतिक बॅंक यांच्यात स्वाक्षऱ्या करण्यात …

Read More »