Breaking News

कृषी

आगामी खरीप हंगामासाठी बियाणं आणि खतांची मुबलक उपलब्धता कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडे बियाणं आणि खतांची कोणतीही कमतरता नाही. शेतकऱ्यांना गरजेनुसार त्याची पुर्तता केली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज दिली. तसेच पीक विम्यासाठी नोंदणी सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी त्याचा वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी केले. कृषी व फलोत्पादन आणि कृषी …

Read More »

कृषी संशोधनात राज्यातील शेतकऱ्यांचे कार्य प्रशंसनीय ११ वा सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार’ वितरण सोहळा राज्यपालांच्या हस्ते संपन्न

मुंबई : प्रतिनिधी कृषी संशोधन आणि विस्ताराच्या क्षेत्रात आपली कृषी विद्यापीठे उत्कृष्ट काम करत आहेत. मात्र, शेतीबाबत कोणतेही औपचारीक शिक्षण न घेतलेले अनेक शेतकऱ्यांनी विद्यापीठांपेक्षाही अधिक चांगले संशोधन केले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी काढले. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्यावतीने रवींद्र नाट्य मंदिर  येथे काल आयोजित ‘११ व्या सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात ते बोलत …

Read More »

शेतक-यांसाठी विशेष अधिवेशन घ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतक-यांवर अतिशय बिकट परिस्थिती ओढवली आहे. मोदी सरकारने घोषणा करूनही शेतक-यांच्या शेतमालाला दिडपट हमीभाव दिलेला नाही. दुधाचे आणि भाजीपाल्याचे दरही घसरत आहेत, या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी केल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार …

Read More »

शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज करण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी शेतकरी कर्जमाफी योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापासून काही कारणाने अजूनही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेत सहभागाची मुदत आता १५ जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. राज्यातील थकित कर्जधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान …

Read More »

सर्व समाजातील घटकांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे रहावे शेतकऱ्यांच्या संघर्षाला साथ देण्याचे शरद पवारांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकार कोणतीच अंमलबजावणी करत नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. बळीराजा सुखासुखी रस्त्यावर येत नाही. त्याला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याला व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. तो कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका घेत असल्याने त्यांच्या पाठिशी समाजातील सर्व घटकांनी उभे रहावे असे …

Read More »

पीक विम्याची रक्कम ७ जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा मुख्यमंत्र्यांचे विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ७ जून पूर्वी जमा झाली पाहिजे याची दक्षता विमा कंपन्यांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. प्रधानमंत्री पिक विम्यासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण …

Read More »

फळे व भाजीपाल्यासाठी कीटकनाशके आणि हार्मोन्सचा अनावश्यक वापर करू नका केंद्रीय कृषी मंत्रालय अहवालाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषीमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी बांधवांनी फळे, भाजीपाल्यावर अनावश्यक कीटकनाशके आणि हार्मोन्सचा वापर टाळावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्र्यांनी आवाहन केले. कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील जांभळी गावातून हिरवी मिरची निर्यात केली जाते. अलीकडे या निर्यात केल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीचे नमुने …

Read More »

तुर खरेदीप्रश्नी सहकारमंत्री देशमुख यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांशी चर्चा शेतक-यांची तुर खरेदी केल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करणार नाही

नवी दिल्ली : प्रतिनिधी शेतक-यांची तुर खरेदी केल्याशिवाय राज्यातील खरेदी केंद्र बंद करणार नाही. लवकरच तुर खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षीत असुन शेतक-यांनी तुर खरेदीबाबत आश्वस्त राहावे असे आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे. तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी आज पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन …

Read More »

फळपिकांचा क्रॉपसॅप योजनेत समावेश करण्याचा निर्णय ४१ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केल्याची कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्रमुख फळ पिके व इतर पिकांवरील कीड रोगांच्या व्यवस्थापनाचे दृष्टीने एकत्रीत क्रॉपसॅप योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २०१८-१९ या चालू वर्षापासून सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या प्रमुख पिकांवरील कीड व रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकत्रित कीड-रोग सर्वेक्षण …

Read More »

राज्यातील शेतकऱ्यांना अचूक हवामानाची सूचना देणार ‘महावेध’ २०६० स्वयंचलित हवामान यंत्रे कार्यान्वित

मुंबई : प्रतिनिधी लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना राज्य सरकारने कार्यान्वित केली आहे. ही अचूक माहिती मिळण्याकरीता ‘महावेध’  ही योजना सुरु करण्यात आली असून या यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे योग्य व्यवस्थापन आणि नुकसान टाळण्यासाठी मदत …

Read More »