Breaking News

कृषी

पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ आता तीन ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार- कृषीमंत्री धनंजय मुंडे

पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. पंतप्रधान पीक …

Read More »

शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या आश्वासनानंतर संयुक्त किसान मोर्चाचे (अराजकीय) प्रस्तावित आंदोलन मागे

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) यांनी सोमवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. या बैठकीत शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठन करून त्या मार्फत केंद्र सरकारकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती …

Read More »

महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना लाभ पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता एका क्लिकद्वारे जमा

राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे असे एकूण १८ हजार कोटी रुपये थेट जमा केले. तसेच देशातील सव्वा लाख ‘पी एम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण केले. ही केंद्र शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतील, असा विश्वास …

Read More »

बोगस बी-बियाणांची विक्री करणाऱ्या कंपन्याच्या विरोधात नवा कायदा आणणार विधानसभा अध्यक्षांच्या स्पष्टीकरणानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक केली जात आहे. सरकारचा कृषी विभाग राज्यभर आहे पण अशा कंपन्यावर सरकारचा वचक राहिलेला दिसत नाही. शेतकऱ्याला लुबडणाऱ्या, त्याची फसवणूक करणाऱ्या मुजोर कंपन्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे, याची विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत केली. यावेळी झालेल्या चर्चेत अनिल …

Read More »

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे आश्वासन, पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार प्रत्येक गावात अंमलबजावणी करणार

ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी, असे उद्दिष्ट आहे, भविष्यात यादृष्टीने आवश्यक निर्णय घेतले जातील. जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, अशी …

Read More »

कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर! गोगलगायी नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेली औषधे जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करून देण्याच्या सूचना

मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई या भागात तसेच मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन व कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या आधारे आज मी स्वतः परळी तालुक्यातील काही गावांमध्ये पाहणी केली असता गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला असल्याचे वास्तव आहे. …

Read More »

धनंजय मुंडे यांची घोषणा; शेतकऱ्यांसाठी डॅशबोर्ड तयार करणार, जोड खतप्रकरणी चौकशी आता व्हॉट्सअॅपवर तक्रार दाखल करता येणार

राज्यातील शेतकऱ्यांना सध्या जोड खतांची खरेदी करावी लागत आहे. मात्र यातील खतांची ऑनलाईन नोंदणी झाल्याशिवाय दुसरे घेता येत नाही. त्यामुळे या जोड खतांमागे व्यापारी, दुकानदार यांचे काही लागेबांधे आहेत असा सवाल करत खत विक्रेत्यांवर कारवाई कऱण्याची मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी …

Read More »

जोड खतांचे गौडबंगल बाळासाहेब थोरात यांच्याकडून सभागृहात उघड कृषीमंत्र्यांकडून आश्वासन; कंपन्यांना समज देणार

खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, मात्र खते खरेदी करताना शेतकरी बांधवांना खतांच्या सोबत जोड खते खरेदी करावी लागत आहे. मात्र यामध्ये खाजगी सरकारी आणि सहकारी कंपन्यांकडूनच विक्रेत्यांना मुख्य खताबरोबर जोड खते सक्तीने दिली जात आहेत, शेतकरी आणि संस्था वाचवण्यासाठी सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते …

Read More »

बियाणे-खते-खरीप पीक कर्जप्रश्नावरून काँग्रेसने मंत्री मुंडे यांना घेरत केला सभात्याग अखेर अर्थमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करत दिले उत्तर

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तास पुकारण्यात आला. यावेळी राज्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खतांच्या किंमतीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री करण्यात येत असल्याची प्रश्न काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस सदस्यांच्या प्रश्नासमोर मंत्री धनंजय मुंडे यांना …

Read More »

पदुम मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आवाहन, पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करा पशुधन जपण्यासाठी शासनाचा प्रयत्न

‘पशुधन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य जपत शेतकरी, पशुपालकांसाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग काम करीत आहे. राज्यातील तीन कोटी पशुधन जपण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करावे, असे पशुखाद्य उत्पादकांना आवाहन करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी …

Read More »