Breaking News

कृषी

प्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक 5 डिसेंबरला जागतिक मृद दिनी गावांमध्ये कार्यशाळा घेण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल असे गावातील जमीनीतील अन्न घटकांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत किती प्रमाणात द्यावेत याची माहिती देणारे सुपिकता निर्देशांक फलक राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत. 5 डिसेंबर रोजी जागतीक मृददिनानिमित्त प्रत्येक गावात कार्यशाळा आयोजित करण्यात यावी, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. ग्रामपंचायत स्तरावर …

Read More »

राज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट कौशल्य विकास दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

मुंबई : प्रतिनिधी मत्स्य कातडीपासून वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योग सुरू करण्याला प्रोत्साहन देण्याचा राज्यात पहिल्यांदाच प्रयोग करण्यात येत असून फिश- ओ-क्राफ्टद्वारे रोजगार निर्मिती हा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम आहे. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागाने उचललेले हे क्रांतीकारी पाऊल आहे. यामुळे नवयुवक आणि मच्छिमार महिलांना नवीन उद्योग व रोजगार प्राप्ती …

Read More »

शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार ३ डिसेंबर रोजी राज्यव्यापी एल्गार किसान संघर्ष समन्वय समितीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. भाजपचे केंद्र सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर दडपून टाकू पाहत …

Read More »

राज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा ७०० रूपये अतिरिक्त देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर धान उपादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार जो हमीभाव देईल त्यापेक्षा जास्त भाव राज्य सरकारकडून देण्यात …

Read More »

एक लाख कृषीपंप जोडण्या देत ग्रामीण भागातील या संस्थाकडून होणार बिलाची वसुली नवीन धोरण जाहीर- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कृषी ग्राहकांची थकबाकी वसूल करण्याकरिता ग्रामविद्युत व्यवस्थापक, ग्रामपंचायत, शेतकरी सहकारी संस्था, महिला बचत गट यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कृषीपंपांची पाच वर्षापुर्वीची व पाच वर्षापर्यंतची थकबाकी व्याज व विलंब आकारात सूट देऊन सुधारित करण्यात येणार आहे. सदर  थकबाकीची रक्कम ३ वर्षात भरण्याची मुभा असणार आहे. पहिल्या वर्षी भरलेल्या रकमेवर …

Read More »

पशुंना वेळेत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी मध्यवर्ती कॉल सेंटर १०८ या टोल फ्री प्रमाणे मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेसाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांक प्रस्तावित

मुंबई : प्रतिनिधी पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी संनियंत्रणासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे मध्यवर्ती कॉल सेंटरच्या स्थापनेसाठी इंडसइंड बँक यांची उपकंपनी असलेली भारत फायनांस इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीसोबत मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व …

Read More »

रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करणार कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कृषि विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारीत व संकरीत वाणांच्या प्रसारासाठी कृषि विभागामार्फत रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार असून त्यासाठी ६२.७९ कोटीची तरतूद करण्यात आली आहे, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. राज्यात चालु वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली मदत शेतकऱ्यांना फसविणारी भाजपाचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टीने थैमान घातले असताना हवालदिल शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने भरीव मदत करणे गरजेचे होते परंतु महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीसाठी जाहीर केले तरी त्यामधील कृषी पिके व घरे यासाठी ५,५०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. जाहीर केलेल्या ९,७७६ कोटी रुपयांपैकी रस्ते पुलासाठी २,६३५ कोटी रुपये, नगर विकाससाठी ३०० कोटी,  महावितरण करीता २३९ कोटी रुपये, जलसंपदा करीता १०२ कोटी रुपये, ग्रामीण …

Read More »

मदत करणार, पण सवंग लोकप्रियता, टाळ्या मिळाव्यात म्हणून घोषणा करणार नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे शेतकऱ्यांना आश्वासन

उस्मानाबाद : प्रतिनिधी मी पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी बोललो आहे, त्यांना भेटलो आहे. जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करणार आहोत. मात्र सवंग लोकप्रियतेसाठी, टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी …

Read More »

पीक विमा कंपन्यांसमवेत तातडीने बैठक आयोजित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश केळी पीकाची नुकसान भरपाई मिळत नसल्याने सरकारचा पुढाकार

मुंबई : प्रतिनिधी केळी पिकासाठी लागू केलेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना लाभ न मिळता विमा कंपन्यांना फायदा होणार आहे या तक्रारींची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाने तातडीने संबंधीत पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून निकष तसेच नुकसानभरपाई संदर्भात मार्ग काढण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री केंद्राला पत्र देखील लिहीणार …

Read More »