Breaking News

कृषी

गाव चावडीवर दूधाभिषेक घालत किसान सभा व दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन दूध उत्पादकांचा राज्यव्यापी एल्गार दणक्यात यशस्वी !

अकोले-अहमदनगर : प्रतिनिधी दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी 1 ऑगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे आंदोलन आज राज्यभर किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जोरदार यशस्वी झाले. महाराष्ट्रातील सुमारे २० जिल्ह्यांत हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात हिरीरीने भाग घेतला आणि आपल्या दुधाचा अभिषेक गावचावडीवर घातला. …

Read More »

दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी महायुतीतर्फे १ ऑगस्टला आंदोलन भाजपाचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न केल्याने भाजपा, रयत क्रांती,  रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) रासप आणि शिवसंग्राम महायुतीतर्फे १ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. महायुतीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विधानसभेतील विरोधी पक्ष …

Read More »

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांचे मंत्रिमंडळाने केले अभिनंदन राज्यात गेल्या १० वर्षातली विक्रमी कापूसाची खरेदी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने विक्रमी २१८.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. आज या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन मंत्र्यांचे अभिनंदन केले. गेल्या १० वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी झाल्याचे प्रधान सचिव, पणन …

Read More »

२००० सालचे धोरण बदलले तरच दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा सहकारीऐवजी शासकिय दूध विक्रीला प्राधान्य देणे गरजेचे

मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील काही वर्षापासून दूध उत्पादक शेतकऱ्याना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांला प्रति लिटर मागे ५ रूपये, १० रूपये अनुदान द्यावी अशी मागणी विविध शेतकऱ्यांच्या संघटनेकडून करण्यात येत आहे. मात्र वास्तविक पाहता राज्य सरकारने २००० साली काढलेले दूधविषयक धोरणात जर बदल केला तर …

Read More »

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणणार दूग्धविकास मंत्री सुनिल केदार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना  घेऊन येणार असल्याचे पशुसंवर्धन दूग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी  दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. या बैठकीस  …

Read More »

शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपवायचीय महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसीत करावी -मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसित करावी. ज्याला बाजारपेठ आहे अशी पिके घ्यावीत. विद्यापीठातील संशोधनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील कृषीविद्यापीठाच्या कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित …

Read More »

या जिल्ह्यात झाली कापसाची विक्रमी खरेदी अकोटच्या सीसीआय केंद्रावर २ लाख ८५ हजार क्विंटल कापसाची खरेदी

अकोला: विशेष प्रतिनिधी अकोला जिल्हयात कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोट तालुक्यात कापसाची विक्रमी खरेदी झाली असून अकोटातील कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या सीसीआयच्या केंद्रावर आतापर्यंत २ लाख ८५ हजार क्विंटल इतक्या विक्रमी कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अकोट तालुक्यात कापूस, ज्वारी, मुग ही खरिपाच्या हंगामातील प्रमुख पिके समजली जातात. कारण ही …

Read More »

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांना महिनाअखेर लाभ सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. सहकार मंत्री म्हणाले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली …

Read More »

मंत्री भुजबळांच्या या मागणीला दानवेंच्या मंत्रालयाने दिली परवानगी जास्तीच्या मका खरेदीला दिली परवानगी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्यात मका धान्याची खरेदी करूनही आणखी मका शिल्लक असल्याने त्याची वाढीव खरेदी करण्यास केंद्राने मान्यता द्यावी अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राकडे केली. त्यावर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने त्यास तातडीने मान्यता दिली. विशेष म्हणजे केंद्राच्या या मंत्रालयाचे भाजपा नेते …

Read More »

बँकांनो शेतकऱ्यांना कर्ज नाकाराल तर फौजदारी गुन्हा गृहमंत्री अनिल देशमुख याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशारा राज्याचे …

Read More »