Breaking News

बँकांनो शेतकऱ्यांना कर्ज नाकाराल तर फौजदारी गुन्हा गृहमंत्री अनिल देशमुख याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी
सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.
शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत (नॅशनलाईज) बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

One comment

  1. Bankemadhil daily wages vr kaam karnare dalal agent he bank manager cha ujva hat astat… Tr tumhi pakdvun dakhva yana rangehath… Mag me
    Tumhala manen… हे lok gairfayda ghet ahet shetkaryancha…
    Commission khaun… जीभ rangleli ahe ya lokanchi…. Darvarshi shetkaryankadun lach ghetlelya paishane… ही lok thailand la jatat aiyashi karnyasathi… he sarv khup nindniy ahe…maharashtra til bankamadhe ani sarvtr

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *