Breaking News

कृषी

कृषी संजीवनी प्रकल्पासाठी जागतिक बँकेसोबत सांमज्यस करार मराठवाडा, विदर्भातील ५ हजार १४९ गावांसाठी २८०० कोटी मिळणार

मुंबई : प्रतिनिधी विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५ हजार १४९ गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पा’च्या अंमलबजावणी आराखडा आज अंतिम करत जागतिक बँकेसोबत सांमज्यस करार करण्यात आल्या.  नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत या प्रकल्प करारनाम्याच्या मसुद्यावर राज्य सरकार आणि जागतिक बॅंक यांच्यात स्वाक्षऱ्या करण्यात …

Read More »

परप्रांतातील ऊसाचे गाळप राज्यात करण्यावर बंदी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील साखर कारखान्याच्या मनमानीमुळे अनेक शेतकर्‍यांचे ऊस गाळप होत नाहीत. यातील काही साखर कारखान्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करण्याऐवजी राज्याबाहेरील शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करून त्याचे गाळप करण्यात येत असल्याची बाब उघडकीस आल्याने साखर कारखान्यांनी कार्यंक्षेत्रा बाहेरील ऊस गाळप करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय राज्याच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत …

Read More »

शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांशी सामंज्यस करार महिंद्रा, रिलायन्स फ्रेशसह २०० कंपन्याशी करार केल्याची मंत्री देशमुखांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सहकार आणि पणन विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी आता कॉर्पोरेट क्षेत्रातील पलासा ॲग्रो, फ्युचर ग्रुप, रॉयल ॲग्रो, महिंद्रा, रिलायन्स फाउंडेशन आणि रिलायन्स फ्रेश आदी कार्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेतला असून अटल महापणन विकास अभियानांतर्गत २०० पेक्षा जास्त कॉर्पोरेट संस्था आणि खरेदी विक्री संघ, वि.का.स. सोसायट्या …

Read More »

बोंड अळी, ओखी वादळ नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे मागणी राज्य सरकारने मागितले केंद्राकडे २ हजार ४२५ कोटी रूपये

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कापूसावरील बोंड अळी आणि ओखी वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यानुसार राज्य सरकारने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केली. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने केंद्राकडे मदत मागण्यात आल्याची …

Read More »

शेतमाल तारण कर्ज योजनेत शंभराहून अधिक बाजार समित्या पणन मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘शेतमाल तारण कर्ज योजना’ सुरु करण्यात आली. शेतमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतमालाला गोदाम आणि अत्यंत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या या योजनेत आतापर्यंत १०३ बाजार समित्यांनी सहभाग घेतला आहे. या योजनेंतर्गत चालू वर्षी ८६ हजार १६६ क्विंटल शेतमाल …

Read More »

शेतीमाल किंमती आणि बोंडअळी नुकसानीचा प्रस्ताव केंद्राकडे नाहीच राज्य सरकारकडून उत्तर न आल्याने विरोधकांचा सभात्याग

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव मिळावा यासाठी सातत्याने गळा काढणाऱ्या भाजप सरकारने शेतीचा दर ठरविण्यासाठी कृषी आयोगाची स्थापना केली. मात्र या कृषी आयोगाने राज्यातील शेती मालाचा हमीभाव ठरविण्याचा प्रस्ताव आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला नसल्याचा खुलासा केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग …

Read More »

वीज बील न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणार वीज मंत्र्यांच्या उत्तराच्या निषेधार्थ विरोधकांचा सभात्याग

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर वीजच्या रकमेची थकबाकी आहे. मात्र काही वीज बीलांच्या रकमेत तांत्रिक कारणामुळे अवाच्या सव्वा वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३ ते ५ हजार रूपये भरावे असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले असून जे शेतकरी सांगितलेली रक्कमही भरणार नाहीत. त्यांना वीज पुरवठा करणारे रोहीत यंत्र आणि वीज …

Read More »

दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या एसटी वाहतूकीवरील बंदी उठविली परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची विधानसभेत माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागातून शहरी किंवा तालुक्याच्या ठिकाणी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पोहचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून एस.टी बसेसचा वापर केला जात असे. मात्र त्यावर गेल्या महिन्यात एसटी महामंडळाने बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होवू लागल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांवर घालण्यात आलेली बंदी उठविण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकार …

Read More »

विदर्भात दुष्काळ जाहीर करा विरोधकांसह सत्ताधारी बाकावरील आमदारांची मागणी: कामकाज तहकूब

नागपूर : प्रतिनिधी विदर्भातील ६५ टक्के धान शेतींला तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. तर १० टक्के जमिनीवर पेरणीच झालेली नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असल्याने त्या भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदीया जिल्ह्यात दुष्काळ जाहीर …

Read More »

राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राचे सहकार्य कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांची बैठकीनंतर माहिती

नागपूर: प्रतिनिधी राज्यातील विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील कापसाच्या शेतीवर बोंड अळीचा रोग झाल्याने मोठ्या प्रमाणावर कापूस शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे कापूस शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक असलेले सहकार्य करण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी राज्य सरकारला दिल्याचे माहिती राज्याचे …

Read More »