Breaking News

कृषी

ऊस वजन काट्यात बनवाबनवी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची घोषणा

नागपूर: प्रतिनिधी राज्यातील काही साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करताना वजन काट्यात बनवाबनवी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात सदर कारखान्याच्या वजन काट्याच्या ठिकाणी भरारी पथकाकडून छापे मारून कारखान्याच्या संचालकांवर कारवाई करणार असल्याची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली. शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करताना काही साखर कारखान्यांकडून त्याच्या वजनात काटा …

Read More »

राज्यातील २२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील ६९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यापैकी ४३ लाख १६ हजार ७६८ खात्यांच्या कर्जमाफीसाठी बँकांकडे पैसे पाठविण्यात आले आहे. तर २२ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या खात्यावर प्रत्यक्ष पैसे जमा झाले असून एकाही शेतकऱ्याचा अर्ज फेटाळला नसून आजही कर्जमाफीसाठी अर्ज आला तर तो मंजूर करण्याची तयारी असल्याची माहीती मुख्यमंत्री …

Read More »

राज्यातील सर्व शेती, शाळा, वसतिगृहांना सौर ऊर्जा पुरविणार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

नागपूर : प्रतिनिधी भविष्यकाळात राज्यात कोळशावर आधारीत वीज शेतीला पुरविणे शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी सोलर यंत्रणेचा वापर करून दिवसाची वीज शेतकऱ्याला पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व शाळांना आणि सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात सौर ऊर्जेवरील वीज पुरवठा करण्यात येणार असून शेती, शाळा आणि वसतिगृहांना सौर ऊर्जा …

Read More »

बोंडअळी व तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांना मदत तीन वेळा देणार कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे विधानसभेत आश्वासन

नागपूर: प्रतिनिधी मराठवाडा आणि विदर्भातील कापूस उत्पादनावर बोंडअळीचा हल्ला झाला. या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या. त्यानुसार अशा शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले असून बोंडअळी बरोबरच तुडतुड्याच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार, बियाणे विकणाऱ्या कंपन्या आणि विमा कंपन्याकडून मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन …

Read More »

फक्त पाच वर्षे अफूची शेती करायची परवानगी द्या शिवसेनेच्या सुभाष साबणे यांची विधानसभेत मागणी

नागपूर : प्रतिनिधी मराठवाडा आणि विदर्भातील शेतीच्या मालाला हमीभाव दिल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. जर हमीभाव देत नसाल तर किमान आमच्या भागातील शेतकऱ्यांना पाच वर्षे अफूची शेती करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून शेतकरी या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडू शकेल. त्यामुळे अफूची शेती करण्याची परवानगी देण्याची मागणी शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे …

Read More »

दूध दराच्या प्रश्नावरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी अध्यक्ष बागडे यांच्या खुलाशाने सरकार अडचणीत

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना २७ रू. प्रति लिटर दूधाचा दर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र सहकारी दूध संघांना हा दर परवडत नसल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत एखादे संस्था उभारणे अवघड आहे. मात्र उध्दवस्त करणे सोपे असल्याची टीका केली. त्यावर पशु …

Read More »

कर्जमाफीच्या कामासाठी आज आणि उद्या बँका सुरु राहणार सर्व जिल्हा सहकारी बँकासह इतर बँकांना कार्यालये सुरु ठेवण्याच्या सूचना

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारने १९ हजार ५३७ कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी दिली. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासह इतर कर्जमाफीच्या कामाकरीता राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँकासह बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज शनिवार ९ डिसेंबर आणि रविवारी १० …

Read More »

कर्जमाफीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील बँकाना निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारकडून आतापर्यंत ४१ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत  मंजूर केलेले १९ हजार ५३७ कोटी रूपये तात्काळ बँकांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मलबार हिल येथील सह्याद्री …

Read More »

कर्जमाफी योजनेंतर्गत १९ हजार ५३७ कोटी रूपये मंजूर ४१ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांसाठी १९, ५३७ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास ३१ डिसेंबर उजाडेल असे वक्तव्य सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केल्यानंतर दोन तीन …

Read More »

बोंडअळी, तुडतुडे यांच्या प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

 मुंबई : प्रतिनिधी राज्यात यंदाच्या खरीप हंगामात अनेक जिल्ह्यातील कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव तर धान पिकावर तुडतुड्या किड्याचा रोग पसरल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे विरोधकांकडून कापूस आणि धानाच्या झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यानुसार अखेर राज्य सरकारने या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे …

Read More »