Breaking News

शरद पवारांना राष्ट्रपती पदी नियुक्त करण्याबद्दल सामुहीक निर्णयाची गरज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मत

मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार ह्यांना राष्ट्रपती पदी नियुक्त करण्याबद्दल देशपातळीवर सामूहिक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर गेल्या १० वर्षात सत्तेपासून लांब राहीलो असून आता माझी दुसरी इनिंग सुरू आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष असून महाराष्ट्राला प्रगत करण्याचे त्यांचे स्वप्न होते, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू असे सांगत त्यांचे जलसंपदा क्षेत्रातील उल्लेखनीय काम व मराठवाडा विभागाचा अनुशेषाचा विषय हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. तो काही अंशी मार्गी लागला असून त्यावर अजून काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शेकाप पक्षाचे जेष्ठ सदस्य माजी आमदार केशवराव धोंडगे यांनी वयाची १०० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा सन्मान महाआघाडी सरकारच्यावतीने करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी शाेवटी सांगितले.
मुंबई -गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातुन आढावा घेण्यात येणार असून राज्यातील अविकसित भागात रस्ते पोहचवून त्या भागाचा विकास करण्यास प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार हे ३ पक्षाचे सरकार असून यामध्ये सर्वानाच सामावून घेणे शक्य होत नाही .त्यामुळे काही सहकाऱ्यांची नाराजी जरूर आहे .मात्र आम्ही त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगून त्याचं समाधान करू. आम्ही ज्या समान किमान कार्यक्रमाकरिता सत्तेत सहभागी झालो ,तशी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा यांची तशी इच्छा होती. त्याची अंमलबजावणी करणार आहोत. याच माध्यमातून राज्याच्या जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांवरील हल्ला निषेधार्थ
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात फी वाढीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणे निषेधार्ह असून अद्याप ह्या हल्लेखोरांना अटक करण्यात आलेली नाही. ह्याची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारची असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. ह्याचा अनुभव आम्ही विरोधी पक्षात असताना घेतला असल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *