Breaking News

शिकाँरासाठी अखेर काँग्रेस नेते पटेल, वेणूगोपाल पोहोचले शरद पवारांकडे शिवसेनेशी नंतर चर्चा करणार असल्याची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना उशीराने का होईना वेग आला आले. कालपासून सुरु असलेला बैठकींचा सिलसिला आजही काँग्रेसकडून सुरु असून शरद पवारांशी अंतिम बैठक करण्यासाठी काँग्रेस नेते अहमद पटेल. मल्लिकार्जून खर्गे आणि वेणूगोपाल राव हे यशवंतराव प्रतिष्ठान येथे संध्याकाळी पोहोचले.
शिकाँरा महाआघाडीच्या सरकारला काल संध्याकाळपासून काँग्रेसकडून बाहेरून पाठिंबा देण्याच्या भूमिका स्विकारण्यात आली होती. मात्र आज सकाळपासून नेमकी उलटी चक्रे फिरत या महाआघाडीच्या सत्तेत सहभागी होण्याच्यादृष्टीने काँग्रेसने चाचपणी सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे.
या महाआघाडीत काँग्रेस सहभागी झाली तरच हे सरकार टिकण्याची अटकळ राष्ट्रवादीने बांधली आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही त्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या. त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून येत आहे.
त्यामुळे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी गांधीचे सल्लागार अहलमद पटेल, सी.वेणूगोपाल राव आणि लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खर्गे आदी नेत्यांना दिल्लीहून मुंबईला पाठविण्यात आल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
या चर्चेचा मुख्य रोख हा शिकाँरामधील खातेवाटप आणि विभाग यांच्या वाटपावरच असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *