Breaking News

वारली चित्रकला पोरकी झाली पद्मश्री जीव्या म्हसे यांचे वृध्दपकाळाने निधन

मुंबई : प्रतिनिधी

बदलत्या काळात कला प्रकार लुप्त होत असताना केवळ आपल्या अतुलनीय कामगिरीच्या माध्यमातून आदीवासी समाजाची वारली चित्रकला फक्त जागतिकस्तरावर नेता सर्वमान्यता मिळवून देणारे वारली चित्रकार पद्मश्री जीव्या म्हसे यांचे वृध्दपकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने वारली चित्रकला पोरकी झाल्याची भावना चित्रकलावंतामध्ये निर्माण झाली आहे.

जीवा सोमा म्हसे यांचा जन्म १९३३ साली पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड या गावी झाला. सुरुवातीलपासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. काही वर्षांपूर्वी आदीवासी समुदायाची संकेतात्मक भाषेत काढली जाणारी वारली चित्रप्रकार लुप्त होण्याच्या मार्गावर होती. मात्र जीव्या म्हसे यांनी या चित्रकलेला जिवंत करण्यासाठी याच प्रकारातील चित्रे काढण्यास सुरुवात केली. त्यांच्या चित्रांनी देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान निर्माण केले. या त्यांच्या कामाची दखल केंद्र सरकारने घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला. जीव्या म्हसे यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावरील पुरस्काराने गौरविण्यात आले.

आदिवासी चित्रकलेचा श्रेष्ठ उपासक-प्रसारक हरपला- मुख्यमंत्री

 वारली या आदिवासी चित्रकलेला वैभव प्राप्त करुन देणारे ख्यातनाम कलाकार पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांच्या निधनाने आदिवासी समुहाची वैशिष्ट्यपूर्ण कला-संस्कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारा उपासक-प्रसारक आपण गमावला आहे,  अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पालघर जिल्ह्यासारख्या दुर्गम भागातील वारली चित्रकला सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या श्री. म्हसे यांच्या धडपडीमुळे वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृतीचे विविध पदर उलगडले. आज वारली चित्रकला ख्यातीप्राप्त झाली असून तिच्या माध्यमातून आदिवासी समुहाचा श्रेष्ठ असा कलाविष्कार समर्थपणे व्यक्त होत आहे. त्यामागे श्री. म्हसे कुटुंबियांचे मोलाचे योगदान आहे. श्री. म्हसे यांच्या कार्याची दखल पद्मश्रीसारख्या नागरी पुरस्काराने देशाने घेतली असून अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांचा झालेला गौरव त्यांच्या कलेची महत्ता दर्शविणारा आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *