Breaking News

संसद भवनाचे उद्घाटन होत असताना आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना हटविलं दिल्ली पोलिसांनी केली कारवाई

विरोधकांनी सातत्याने टीका करून बहिष्काराचे अस्त्र उगारूनही नव्या संसद भवनाचं रविवारी २८ मे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. तर भाजपाचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह सरण यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी दुसरीकडं नवीन संसद भवनाच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. यापार्श्वभूमीवर कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुरक्षेचं कारण देत दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळाला. जंतर-मंतर मैदानावरील कुस्तीपटूंचे तंबूही पोलिसांनी हटवले.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण, ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणी करत कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी जंतर-मंतर ते नवे संसद भवन अशा मार्चचं आयोजन केलं होतं.
त्यानुसार कुस्तीपटू ११.३० मिनिटांनी नव्या संसद भवनाकडे निघाले होते. पण, त्यापूर्वीच पोलिसांनी कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अन्य काही जणांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाल्याच समोर आलं आहे.

कुस्तीपटू साक्षी मलिकने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात पोलीस बळाचा वापर संगीता फोगाट आणि विनेश फोगाट हिला गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या हातात भारतीय ध्वज तिंरगाही दिसत आहे. ट्विटवर साक्षी मलिकने लिहलं की, आपल्या खेळाडूंना अशी वागणूक दिली जात असून, जग सगळं पाहत आहे.

बजरंग पुनियानेदेखील ट्वीट करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत एखादं सरकार आपल्या खेळाडूंबरोबर असं वागतं का? आम्ही काय गुन्हा केला आहे, असा सवाल बजरंग पुनियाने उपस्थित केला.

https://twitter.com/SakshiMalik/status/1662755230562529280?s=20

दरम्यान, ऑल्मपिक विजेत्या कुस्तीपटू खेळाडूंसोबत दिल्ली पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांकडून शेअर करण्यात येत आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *