Breaking News

देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट, गडकरींसाठी आलेला तो फोन बेळगांवच्या जेलमधून नागपूर पोलिस गेले कर्नाटकात

काल शनिवारी सकाळी अर्ध्या तासात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या नावाने १०० कोटी रूपये द्या अन्यथा घर आणि जनसंपर्क कार्यालयात बॉम्बस्फोट उडवून देण्याची धमकी देणारा फोन करण्यात आला. त्यामुळे राज्यासह पोलिस दलात एकच खळबळ माजली. याबाबत राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हा धमकीचा फोन एका आरोपीने कर्नाटकातील बेळगावमधील तुरुंगातून केल्याचे तपासात उघड झाले आहे असे सांगितले.

दरम्यान, यामागे नेमकं कोण? तुरुंगातून फोन कसा काय केला जाऊ शकतो? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आज(रविवार) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. नागपुरातील रेशिमबागेत आयोजित एका विशेष बैठकीसाठी ते आले होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, नितीन गडकरींना धमकीचा आला होता. त्याचा आम्ही शोध घेतला आहे आणि तत्काळ असं लक्षात आलं की, हा फोन कर्नाटकातील बेळागावमधून आलेला आहे. यानंतर तात्काळ नागपूर पोलिसांनी बेळगाव पोलिसांच्या मदत घेतली आणि बेळगाव पोलिसांशी चर्चा करून, त्याचा शोध घेतला गेला. तेव्हा असं लक्षात आलं की, एक व्यक्ती तिथल्या जेलमध्ये आहे. त्या व्यक्तीने हा धमकीचा फोन केला.

याचबरोबर, आता त्याच्यापर्यंत मोबाईल कसा पोहचला?, कोणाच्या माध्यमातून हे त्याने केलं आणि का केलं?, त्याचा पाठीमागे अजून कोणी आहे का? याची पडताळणी पोलीस विभाग करेल. कर्नाटक पोलिसही यामध्ये आम्हाला मदत करत आहे. याची सर्व माहिती आपल्या एका टीमने तपास केला आहे. मात्र जोपर्यंत यामगचा उद्देश लक्षात येत नाही, तोपर्यंत हा तपास सुरूच राहील असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.

याशिवाय, जेलमधून फोन कसा केला गेला? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर फडणवीस म्हणाले की, कर्नाटक सरकार त्यासंदर्भात कारवाई करेल. त्याने जेलमधून फोन केलाय?, त्यानेच केलाय?, कसा केलाय?, अशा सगळ्या गोष्टींची पडताळणी सुरू आहे. प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात येतंय की त्याच व्यक्तीने केला आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *