Breaking News

बाल न्याय अधिनियमातील कायद्यानुसार भारतातील पहिले दत्तक विधान नगर मध्ये दत्तक विधानाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना

२३ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात कार्यान्वित झालेल्या बाल न्याय अधिनियमातील नवीन बदलानुसार भारतातील पहिले दत्तक विधान आज अहमदनगर मध्ये संपन्न झाले. स्नेहालय संचालित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राने यासंदर्भात पथदर्शी काम केले. भारतातील  दत्तक विधान  प्रक्रियेला मोठा ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा आहे. तथापी समाजात दत्तक विधानाबद्दल अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा होत्या.

हिंदू दत्तक विधान कायदा १९५६ नुसार हिंदू  धर्मामध्ये दत्तक विधान प्रक्रिया केली जात असे. तर इतर धर्मीयात मुलाच्या प्रतिपालनाचा अधिकार मिळत असे. १९९४ साली  बाल न्याय अधिनियम  कायदा  अस्तित्वात आला. १९९४  ते २०२१  या काळात यामध्ये कायदया मध्ये  अनेक बदल घडून आले. २०१५ साली केंद्रीय दत्तग्रहण संस्था (Central Adoption Resources Authority – कारा ) यांनी दत्तक विधान प्रक्रिया  ऑनलाइन केली. परंतु कारा संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये त्रुटी असल्यामुळे २०१७ साली दुरुस्त  नियमावली  लागू केली. तरीही दत्तक विधान प्रक्रिया अवघड वाटत होती. दत्तक प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून २३ सप्टेंबर २०२२ रोजी नवीन नियमावली काराने लागू केली.

नवीन नियमावली नुसार भारतातील पहिले दत्तक विधान येथील स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राने केले. यापुढे दत्तक विधानासंबंधीच्या प्रक्रियेचे अधिकार जिल्हा न्यायालया ऐवजी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. वर्ष २००३ पासून अनाथ मुले, अत्याचारित माता आणि बालमातांच्या प्रश्नांवर स्नेहांकुर काम करते. स्नेहांकुर  केंद्रामध्ये अतिदक्षता विभाग असून ० ते ६ वर्षापर्यंतच्या बालकांचे दत्तक विधानाद्वारे  पुनर्वसन केले जाते. विशेष गरजयुक्त मुलांच्या पुनर्वसनात स्नेहांकुर देशात अग्रणी आहे. आजवर २ हजारांवर बालकांचे आणि ९३५ बालामाताचे  कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुरने केले .

लोकसहभागातून मुली वाचवा अभियान अहमदनगर जिल्ह्यात राबवून जनजागृती स्नेहांकूर संस्था करते. अहमदनगर जिल्ह्याची बालकल्याण समिती आणि जिल्हा बाल संरक्षण पथक या यंत्रणा स्नेहांकूरला मार्गदर्शन करीत असतात.

मुल दत्तक हवे असल्यास, कुठेही बेवारस मूल – अत्याचारित माता अथवा बालमाता आढळल्यास तातडीच्या मदतीसाठी ९०११०२६४८३.  या क्रमांकावर अथवा मॅकडोनाल्ड मागे, केडगाव, अहमदनगर येथील प्रकल्पाशी संपर्काचे आवाहन स्नेहांकुर  उपक्रमाने केले आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *