Breaking News

बंडखोरांचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणाले, तर त्या १६ जणांची आमदारकी धोक्यात उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सत्तानाट्याला सुरुवात

२४ तासापूर्वी शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या १६  आमदारांवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून अपात्रतेच्या कारवाईचा बडगा उगारला होता. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही लढाई लढली गेली. मात्र ती अद्याप अनिर्णित स्थितीत आहे. तर दुसऱ्याबाजूला उध्दव ठाकरे यांच्या समर्थक असलेल्या आमदारांची संख्याही १६ आहे. आता या १६ आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचा इशारा बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी दिला.

उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. त्यासाठी बंडखोर शिवसेना आमदारांचे नेते एकनाथ शिंदे हे गोव्यावरुन मुंबईत दाखल होण्यासाठी रवाना झाले.

बंडखोर गटाकडून सभागृहामध्ये व्हीप काढला जाण्याचे संकेत बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी देत दिलेल्या माहितीनुसार जर गटाने व्हीप काढला तर ३९ बंडखोर आमदारांबरोबरच शिवसेनेच्या उर्वरित १६ आमदारांनाही तो लागू होणार आहे. हे १६ आमदार उद्धव ठाकरेंचे समर्थन करत आहेत. २१ जून रोजी पहिल्यांदा बंडाचं निशाण उभारल्यापासून बंडखोर गटाकडून अधिक आमदार संख्या असल्याने आपला गटच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. सर्वोच्च न्यायालयासमोरही त्यांनी असा दावा केला होता.

आता बंडखोर गटाने व्हीप काढण्याचा निर्णय घेतला तर उद्धव ठाकरे समर्थक आमदार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बंडखोर आमदारांचे प्रवक्ते असणाऱ्या केसरकर यांनी गोव्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना यासंदर्भातील माहिती दिली. त्यांना पक्षाने जारी केलेल्या व्हीपचं पालन करावं लागणार आहे. तसं केलं नाही तर त्यांची आमदारकी धोक्यात येईल असे केसरकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर सेलिब्रेशन झाल्याचं चित्र उभं करण्यात आलं. मात्र असं काहीही झालेलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि नेते असल्याने हा आमचा हेतू नव्हता. ज्यांच्यासोबत आघाडी झाली त्यांच्याविरोधात हे होतं. त्यांचं मन दुखावणं, अपमान होणं हा आमचा हेतू नव्हता अशी सारवासारवही त्यांनी यीवेळी केली.

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत लढताना आमच्या नेत्यासोबत अप्रत्यक्ष लढावं लागलं याचे दु:ख आहे. आम्ही सांगितलेली भूमिका न घेतल्याने हा संघर्ष झाला. आम्ही गेल्या दीड वर्षांपासून त्यांना आपल्या मूळ मित्रपक्षासोत राहावं असं सांगत होतो. आजही आमची भूमिका तशीच आहे. आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. आमदारांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *