Breaking News

देवेंद्र फडणवीस आजारी असल्याचे कळताच संजय राऊत यांनी केले “हे” ट्विट फडणवीसांना कोरोनाची लागण

भाजपाच्या हाता तोंडाशी असलेल्या सत्तेचा घास काढून घेत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली. त्यातच संजय राऊत यांच्या टीकेमुळे तर दस्तुरखुद्द भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देण्याचेही बंद केले. मात्र देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच संजय राऊत यांनी ट्विट करत काळजी घ्या, लवकरात लवकर आपल्या प्रकृतीस आराम पडो अशा शुभेच्छा दिल्या.

नुकतेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. मात्र अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने फडणवीस यांनी सोलापूराचा दौरा रद्द करत पुन्हा मुंबईकडे परतले. त्यानंतर त्यांनी आज कोरोनाची चाचणी केली. त्यावेळी त्यांचा चाचणी अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वत:ला विलगीकरणात ठेवावे आणि प्रत्येकाने कोरोनाची चाचणी करावी असे आवाहन ट्विट करत केले.

राज्यातून राज्यसभेवर जाणाऱ्या सहा जागांसाठी निवडणूक जाहिर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली. त्यातच संभाजी राजे यांच्या उमेदवारीवरून भाजपा विरूध्द असा सामना रंगलेला असतानाच दस्तुरखुद्द श्रीमंत शाहु महाराज यांनी संभाजी राजे यांच्या उमेदवारीप्रकरणी भाष्य करत त्या नाट्यामागे देवेंद्र फडणवीस हेच असल्याकडे अंगुलीनिर्देश केला.

त्यामुळे शिवसेना-भाजपातील वाद आणखीनच पेटला. त्यातच संजय राऊत यांनी श्रीमंत शाहु महाराजांची भेट घेतल्यानंतर तर यात आणखीनच तेल ओतले गेले. त्यामुळे फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता किडक्या डोक्याचे काही लोक अशी खोचक टीका केली.

याशिवाय अयोध्येतील बाबरी मस्जिदीचा ढाचा पाडण्यावरूनही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्य केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपामधील संबध कमालीचे ताणले गेल्याचे दिसून येत आहेत. मात्र फडणवीसांच्या आजारपणाचे वृत्त कळताच संजय राऊत यांनी फडणवीसांना काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच तब्येतीला लवकर आराम पडो अशी सदिच्छाही व्यक्त केली.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *