Breaking News
anil [arab

शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यावर अखेर ईडीची धाड शासकिय निवासस्थानासह सात ठिकाणी टाकले छापे

जवळपास मागील एक वर्षापासून भाजपाचे किरीट सोमय्या हे शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई होणार होणार असल्याचे सातत्याने सांगत होते. त्यानुसार आज सकाळीच परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या अंजिक्यतारा बंगल्यासह सातवे ठिकाणी ईडीने छापे टाकले. त्याचबरोबर दापोली रिसॉर्टसाठी पुण्यातील साठे नामक व्यक्तीकडून जमिन खरेदी केली होती. त्याच्याही पुणे येथील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून चौकशी सुरु केली.

वाचा

ईडीने धाडी टाकल्यानंतर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी चुटक्या वाजवित प्रतिक्रिया देताना म्हणाले की, परिवहन मंत्री अनिल परब यांनाही आता तुरूंगाची हवा खावी लागेल. त्यांनी आता त्यासाठी तयार रहावे, असा इशारा दिला. अनिल परब यांच्या निवासस्थानी व राज्यात सात ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापासत्र सुरू केले. सोमय्या यांनी परब यांच्या विरोधात विविध पातळ्यांवर तक्रारी नोंदविल्या असून ईडीने त्यासंदर्भात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यानेही परब यांना पैसे दिल्याचा जबाब दिला आहे.

बेनामी मालमत्ता, आर्थिक अफरातफर (मनी लाँड्रिंग), बोगस (शेल) कंपन्या, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालयाकडे करण्यात आलेल्या तक्रारी आणि फेमा कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघनासाठी ईडीने कारवाई सुरू केली आहे. मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे तुरूंगात गेले. आता परब यांची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.

यशवंत जाधव यांच्या दुबई संबंधांची ईडीने चौकशी केली असून हसन मुश्रीफ व अन्य नेत्यांची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील गैरव्यवहार करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षाही सोमय्या यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अनिल परब यांच्याविरोधात ईडीने बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांने अनिल परब यांचे नाव आयपीएस अधिकारी परमबिर सिंग यांनी केलेल्या आरोपप्रकरणी दिलेल्या जबाबात घेतले. त्यामुळे ईडीने कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

ईडीने कारवाईत शिवसेनेचे अनिल परब हे पाचवे व्यक्ती आहेत. यापूर्वी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, ईडीने कारवाई केली. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरही ईडीने कारवाई केली. त्यानंतर आता अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारला. तर महाविकास आघाडीतील तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने अटक करून त्यांना तुरुंगात टाकले.

Check Also

मुंबईकरांनो २० मे रोजी कुठेही जाऊ नका, मनापासून मतदान करा

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांसह मुंबई शहरातील सहाही मतदारसंघात २० मे २०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *