Breaking News

संजय राऊत म्हणाले, धाडी टाकल्याने निवडून येतील असे वाटत असेल तर… राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला

नियोजित कार्यक्रमानुसार राज्यसभेच्या निवडणूकीकरीता शिवसेनेकडून प्रवक्ते संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे दोघेही आज आपले अर्ज भरणार होते. तत्पूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकिय निवासस्थानासह त्यांच्याशी संबधित सात ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपाकडून दबावतंत्र सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना आणि महाविकास आघाडी दबावाला भीक घालत नसल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा

तसेच यशवंत जाधव आणि अनिल परब हे शिवसैनिक असून त्यांच्या पाठिशी शिवसेना सदैव राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या सर्व कारवाया फक्त राजकीय सूडबुद्धीनं आणि बदल्याच्या भावनेनं सुरू आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला काय चाललंय हे माहिती आहे. हा काळही निघून जाईल आणि एक दिवस ही सूत्र आमच्याकडे असतील असेही ते म्हणाले.

राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राज्यसभा निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. त्यातच दोन उमेदवार आरामात राज्यसभेवर निवडून जाण्याची खात्री असताना भाजपानं तिसरा उमेदवार देखील उभा करण्याचे सूतोवाच दिले आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध न होता लढवली जाणार असल्याचे चित्र दिसत असल्याचे अजित पवारांनी आधीच स्पष्ट केले.

वाचा

त्यातच शिवसेनेकडून दोघांनी उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले. दुपारी संजय राऊतांनी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेवर जातील यात कोणतीही शंका नसल्याचं सांगितले. शिवसेनेकडून मी स्वत: आणि कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, आमचे सगळे मंत्री, आमदार, एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, खासदार, संपूर्ण महाविकास आघाडी यावेळी उपस्थित होते. मी खात्रीनं सांगू शकतो की यावेळी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेत जातील. आमच्या मनात कोणतीही शंका नसल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल ३१ तारखेला अर्ज भरतील. काँग्रेसचा उमेदवार ठरल्यावर ते भरतील. पण महाविकास आघाडी एकत्र आहे. सहा जागांपैकी आमच्या चार जागा आम्ही निवडून आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपानं तिसरा, चौथा, पाचवा उमेदवार द्यावा. आम्ही आमच्या जागा निवडून आणू. ईडी, सीबीआय हे दबाव टाकून त्यांच्या जागा जिंकून येणाऱ्या असतील, तर त्यांनी प्रयत्न करत राहावेत. आमची काही अडचण नाही. देशात लोकशाही आहे. आमच्या जागा लढण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. शिवसेना अशा दबावाला भीक घालत नसल्याचेही ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *