Breaking News

मुख्यमंत्री पदाची सुत्रे घेतल्यानंतर भगवंत मान यांनी केली “ही” घोषणा भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी सुरु करणार हेल्पलाईन

शहीद भगतसिंग आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचा नारा देत पंजाबची सत्ता मिळविणाऱ्या आम आदमी पक्षाच्या सरकारचा काल शपथविधी पार पडला. शपथविधी झाल्याबरोबर राज्यातील जनतेला भ्रष्टाचारापासून मुक्ती देण्यासाठी भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री मान यांनी केली.
भगवंत मान यांनी पंजाबमध्ये २३ मार्च रोजी शहीद दिवसाच्या निमित्तानं भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन क्रमांक जारी करणार असल्याचे जाहीर करत त्या हेल्पलाईनमध्ये माझा देखील मोबाईल क्रमांक असेल, असं मान यांनी स्पष्ट केले. पंजाबमध्ये जर कोणी तुम्हाला लाच मागितली तर त्यांना नकार देऊ नका, त्याचा व्हिडीओ आणि ऑडिओ बनवून मला पाठवा, असं मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगत माझे कार्यालय त्या प्रकरणाची चौकशी करेल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्याच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार असल्याचे जाहीर केले होते. हे पाऊल पंजाब राज्यासाठी ऐतिहासिक ठरेल दिल्ली प्रमाणे आम आदमी पार्टीचे पंजाबमधील सरकार भ्रष्टाचाराविरोधात कडक पावलं उचलणार आहे. आम आदमी पक्षाची स्थापना देखील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झाली होती. त्यामुळं पंजाबमधील आप सरकार देखील आता भ्रष्टाचार प्रकरणातील कारवाई तीव्र करणार असल्याचे दिसून येत आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांनी पहिल्या बैठकीला संबोधित केले. यासंदर्भात पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयानं माहिती दिली आहे. राज्यातील पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत लोकसेवकाप्रमाणं वर्तन ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशाद्वारे भगवंत मान यांचा नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यातील संबंध चागंले राहावेत असा प्रयत्न दिसतो.
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भ्रष्टाचार आज एक मोठा मुद्दा आहे. आपने निवडणूक प्रचारादरम्यान यासंदर्भात आश्वासन दिले होते. पजाबसह देशाच्या काही भागांमध्ये नागरिकांकडून विविध कारणांसाठी लाच मागितली जाते, त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो असे स्पष्ट केले.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *