Breaking News

आर्यन खान प्रकरणी नवी ट्विस्ट: मोहित कंबोज आणि विजय पगारेंकडून नवे खुलासे सुनिल पाटीलचे नवे नाव पुढे

मुंबई: प्रतिनिधी

कॉर्डिलिया क्रुज ड्रग्जप्रकरणी आर्यन खान यास अटक केल्यानंतर या प्रकरणाबाबत नवनवे खुलासे बाहेर येत असून आज या ड्रग्ज प्रकरणाचा मुख्य सुत्रधार म्हणून सुनिल पाटील हा असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचा नेता मोहित कंबोज यांनी केल्यानंतर सुनिल पाटील याचा मित्र विजय पगारे यानेही त्यास अप्रत्यक्ष दुजोरा दिला. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणी के.पी.गोसावी, मनिष भानुशाली आणि सुनिल पाटील यांच्या दरम्यान सुरु असलेली चर्चा ऐकल्याची धक्कादायक माहिती विजय पगारे यांनी दिल्याने यासंपूर्ण प्रकरणात चांगलीच ट्विस्ट निर्माण झाली आहे.

आज सकाळी मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषदत घेत सुनिल पाटील यांच्या नावाचा गौप्यस्फोट केला. तसेच तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक फाऊंडेशनशी संबधित असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी सॅम डिझुजा आणि सुनिल पाटील यांच्यात व्हॉट्सअॅपवरून बोलणे आणि मेसेजवरून चॅट झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

याशिवाय माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे चिरंजीवांचे सुनिल पाटील हे चांगले मित्र असल्याचा दावा त्यांनी केला.

याशिवाय सुनिल पाटील आणि नवाब मलिक हे ललित हॉटेलमध्ये काय करत होते त्या दोघांमध्ये काय संबध आहेत असा सवालही कंबोज यांनी केला.

तर सुनिल पाटील यांचे मित्र विजय पगारे यांनी के.पी.गोसावी याच्याशी सुनिल पाटील सोबत असताना गुजरातमधील अहमदाबाद येथे भेट झाल्याचे सांगत त्यानंतर मी त्यांच्याबरोबर सांताक्रुज येथील ललित हॉटेल येथे रहात असताना त्यांच्या अनेक पार्ट्या होत होत्या. तसेच त्यांना भेटायला अनेकजण येत होते. वाशी येथील फॉर्च्युन हॉटेलमध्ये मी सुनिल पाटील यांच्याबरोबर राह्यला होतो. २ तारखेला ते गुजरातला गेल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मनिष भानुशाली हे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला तुम्हाला पैसे मिळणार आहेत सोबत चलण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही गाडीत बसून निघालो असता भानुशाली हे फोनवरून कोणाशी तरी बोलत होते. त्यावेळी ते भाऊ म्हणून बोलत असताना सुनिल पाटील यांच्यासोबत बोलत होते. तर गुजराती आणि हिंदीत बोलत असताना तो कोणाशी बोलत आहेत हे आपल्याला माहित नाही. परंतु वाशीहून मुंबईला येत असताना ते समीर वानखेडे यांच्याशी बोलणे झाले का म्हणून दोन वेळा बोलल्याचे पगारे यांनी सांगितले.

मुंबईत आल्यानंतर एका ऑफिसच्या बाहेर अनेक मिडीयावाले होते. भानुशाली गाडीत बसून कोणाबरोबर तरी सतत बोलत होते. मी कुतुहल म्हणून काही मिडीयावाल्यांना काय झालेय ते विचारले. त्यावेळी त्यांनी मला शाहरूखच्या मुलाला आणण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळानंतर मला सुनिल पाटील याचा मला फोन आला आणि त्याने तिथे का आला आहेस अशी विचारणा केली. तो प्रचंड रागात माझ्याशी बोलत होता. मी त्याच्याशी रागात बोललो. त्यावेळी त्याने मला माझ्या रूमवर जावून थांबण्यास सांगितले. त्यानंतर मी माझ्या रूमवर निघून आल्याचे त्यांने सांगितले.

त्यानंतर मला संशय आला हे नक्की काय तरी मोठा झोल आहे ते. मी रूमवर येवून टिव्ही लावला तर मला आर्यन खानची केस मला कळाली. त्यानंतर मी सुनिल पाटील याला फोन करत होतो. मात्र तो फोन उचलत नव्हता. नंतर एकदा त्याने माझा फोन उचलूला आणि सांगितले की तुला तुझे पैसे उद्या मिळतील. त्यानंतर सगळ्यांचेच फोन बंद झाले. त्यावेळी प्रभाकर सैल याचा मला फोन येत होता. त्यावेळी मी त्याला दोन वेळा पाचशे रूपये पाठविले. त्यानंतर मी त्याला नवाब मलिक यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिल्याचेही पगारे यांनी सांगितले.

दरम्यानच्या काळात सुनिल पाटील यांनी सांगितले की के.पी.गोसावी याच्या सेल्फीमुळे १८ कोटी रूपयांची डील हातातून गेल्याचे सांगत एक सेल्फी १८ कोटींना पडल्याचे असे तो सांगत होता. सुरुवातीला हि डील २५ कोटीला ठरली होती. नंतर ती १८ कोटींना झाल्याचा दावाही त्यांनी केला.

सुनिल पाटील याचे अनेक राजकिय नेत्याशी संबध असून ते पैशासाठी काहीही करू शकतात. त्यांना कोणाला अडकवलं आणि कुणाला फसवलं याचे काहीही देणघेणं नसल्याची माहिती त्याने यावेळी उघडकीस आणली. मात्र विनाकारण आर्यनला अडकाविण्यात येत असल्याची मला जाणीव झाल्याने मी स्वत:हून पोलिसांमध्ये जावून स्टेटमेंट दिल्याचेही पगारे यांनी सांगितले.

एकदा पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर नंतर त्याला कोण्या दुसऱ्याच्या हवाली केले जाते का? मग आर्यन खानला कोणी अटक केली त्याला पकडून कार्यालयात कोणी आणलं? त्याला अटक केलेली नसताना दुसऱ्या रूममध्ये का बसविण्यात आले यावरून हे प्रकरण काय आहे याचा लगेच अंदाज येत असल्याचे पगारे यांनी स्पष्ट केले.

सुनिल पाटील, मनिष भानुशाली आणि के.पी.गोसावीचे गुजरातच्या नेत्यांसोबत व्हायरल फोटो:-

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *