Breaking News

नवाब मलिकांचा दिवाळीनंतरचा पहिला बॉम्ब….वाचा कोणते केले गौप्यस्फोट चांडाळ चौकडीला हटवा: शाहरूख, पूजाला धमक्या, कटाचा मुख्य सुत्रधार मोहित कंबोजच- नवाब मलिक यांचा दावा

मुंबई: प्रतिनिधी

शहरात ड्रग्जचे स्वत:चे रॅकेट चालविले जावे या उद्देशाने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे, व्ही.व्ही.सिंग, रंजन आणि एक ड्रायव्हर माने ही चांडाळ चौकडी काम करत असून या चार जणांना हटविल्याशिवाय एनसीबीची प्रतिमा स्वच्छ बनणार नाही अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत जर नवाब मलिक यांनी बोलायचे बंद केले नाहीतर तुझा मुलगा लंबे समय के लिए अंदर गया आणि तुमने पैसा दिया है तो तुम पे भी हम झुटा केस बनायेंगे अशा प्रकारच्या धमक्या अभिनेता  शाहरूख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांना देण्यात येत असल्याचा गौप्यस्फोट करत करत यासंपूर्ण प्रकरणा मागे भाजपा नेते मोहित कंबोज हेच सुत्रधार असल्याचा आरोप त्यांनी केला.

यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच दिवाळीनंतर आपणच बॉम्ब फोडणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार त्यांनी मोहित कंबोज, समीर वानखेडे यांच्यासह चार जणांची नावे जाहीर केली.

मोहित कंबोजच खरा सुत्रधार

हे संपूर्ण प्रकरण किडनॅप आणि खंडणीचे असून आर्यन खान या किडनॅप करून शाहरूख खानकडे खंडणी मागितल्याचे हे प्रकरण आहे. या संपूर्ण कटाचा सुत्रधार मोहित कंबोजच असल्याचा आरोप करत त्याच्या घरावर दिड वर्षापूर्वी रेड झाली होती. त्यानंतर तो भाजपात गेला आणि त्यानंतर त्याचे प्रकरण दाबले गेल्याचा आरोप त्यांनी केला.

सॅम डिसुझा यांचे खरे नाव सॅनियल स्टॅनली डिसुझा असे असून मागील एका प्रकरणात जे पाच आरोपी होते. त्यातील हा पाचव्या क्रमांकाचा आरोपी आहे. त्याला काही दिवसांपूर्वी एनसीबीने हजर राहण्याची नोटीस बजावली होती. परंतु त्यास अद्याप का अटक करण्यात आली नाही असा सवाल करत ही नोटीस मिळाल्यानंतर डिसुझा आणि एनसीबी अधिकारी व्हि.व्ही.सिंग यांच्यात फोनवरून बोलणे झाल्याची ऑडिओ क्लिपही त्यांनी यावेळी ऐकविली.

तसेच याप्रकरणात हवाल्याच्या माध्यमातून ५० लाख रूपयांची देवाण-घेवाण केल्याची कबुलीही सॅम याने दिली. मात्र के.पी.गोसावीच्या एका सेल्फीमुळे १८ कोटी ठरलेली डिल कॅन्सल झाल्याचे पगारे यांनी सांगितल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सुनिल पाटील आणि सॅनियल डिसूझा यांच्या जे बोलणे झाले. त्याची माहिती भाजपा नेते मोहित कंबोज यानेच उघड केली हे एक बरे झाले असून मच्छली खुदही अपने जाल मे फस गई असे सांगत मोहित कंबोज यांचा मेव्हणा रिषभ सचदेवा आणि फर्निचरवाला या दोघांनीच आर्यन खान याला क्रुज शिपवर जाणीवपूर्वक आणले असा आरोप करत या कटाचा खरा सुत्रधार हा मोहित कंबोजच गौप्यस्फोट करत आर्यन खान स्वत:हून तिकिट काढून क्रुजवर गेला नाही असेही त्यांनी सांगितले.

तसेच आर्यन खान याला क्रुजवर आणून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचे षडयंत्र होते. त्यासाठीच मोहित कंबोजचा मेहुणा रिषभ सचदेवा यांच्या माध्यमातून हे प्रकरण घडविण्याचा कट आखण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

वानखेडे आणि मोहित कंबोजचे जवळचे संबध

मोहित कंबोज आणि समीर वानखेडे याचे फार जवळचे संबध असून यासंदर्भात आम्ही सांगितले होते की, या दोघांची लवकरच एक चित्रफित जारी करू म्हणून परंतु त्यांचे नशीब चांगले असून हे दोघे ज्या बडा कबरस्थानजवळ भेटले त्या ठिकाणचा पोलिसांचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता. परंतु तेथील रहिवाशांनी सांगितले की, त्या दिवशी एक गाडी आली होती. त्यात सगळे कंमाडो होते. त्यानंतर दुसरी एक गाडी आली. त्यानंतर या दोघांची तेथे भेट झाल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रकरणात सुनिल पाटील याचे नाव मोहित कंबोज यानेच जाहिर केले. ज्या दिवशी प्रभारकर साईल याचा जबाब बाहेर आला. त्यादिवशी मला सुनिल पाटील याचा फोन आला होता. त्यानेही याप्रकरणाशी संबधित अनेक गोष्टींची माहिती माझ्याजवळ असून ती देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर मी त्याला मुंबईत येवून भेटण्यास सांगितले. मात्र तो आला नाही. त्यानंतरही त्याचे फोन मला आले. तसेच त्यावेळी त्याने मी यायचा प्रयत्न करतोय. पण मला गुजरातमध्ये थांबवून ठेवण्यात आल्याचे पाटील याने मला फोनवर सांगितले. पण तो प्रत्यक्ष मला येवून भेटला नाही. तो एकप्रकारचा फ्रॉड माणूस असून त्याला मी कधीही भेटलेलो नाही. तसेच तो राष्ट्रवादी पार्टीशी संबधित नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.

विजय पगारे हे माझ्याकडे आले होते. त्यांनाही मी पोलिसात जावून जबाब देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पोलिसात जावून जबाब दिला. तसेच मागील सात महिन्यात सांताक्रुज येथील ललित हॉटेलमध्ये जी रूम बुक होती. तेथे सुनिल पाटील आणि विजय पगारे हे रहात होते हे विजय पगारे यांनीच सांगितले आहे. तसेच तेथे काय कबाब, शबाब आणि काय काय चालत होते ते त्यांनीच जाहिर केलेले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

काशिफ खानने मंत्री अस्लम शेख यांनाही आमंत्रित केले होते:

काशिब खान याचेही नाव काशिफ मलिक खान असे असून दिल्लीच्या न्यायालयाने याला फरार म्हणून घोषित केले आहे. तो स्वत:ला फॅशन टिव्हीचा हेड म्हणून सगळ्यांना सांगत फिरतो. परंतु त्याच्यावरही अनेक गुन्हे दाखल असून त्याचे आणि समीर वानखेडे याचे जवळचे संबध आहेत. त्यालाही आतापर्यत का अटक झाली नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच या पार्टीसाठी काशिफ खान हा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही आमंत्रित करत होता. त्यासाठी त्याने अनेकवेळा मंत्री शेख यांना फोन केला आहे. मात्र शेख हे गेले नाहीत. मंत्र्यांच्या मुलांना आणि मंत्र्यांना या पार्टीला आमंत्रित करून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा कट होता असा गंभीर आरोप त्यांनी त्यावेळी केला.

एनसीबीतील ती चांडाळ चौकडी आणि प्रायव्हेट आर्मी

माझ्या जावयाला अटक करण्यात आली त्यावेळी रंजन या एनसीबी अधिकाऱ्याने जावयाला रेंज रोव्हर गाडी विकत घेवून देण्यास सांगितले होते असा आणखी एक गौप्यस्फोट करत समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीत राजीव बजाज आणि अॅड.नंबीयार हे दोन पत्रकारही काम करत असल्याचे सांगत वानखेडे यांच्या टीममध्ये असे अनेकजण असून त्यांच्या मार्फत खंडणी वसूली करणे, खोट्या केसेस टाकणे आदी गोष्टी करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी करत यावेळी नंबीयार याचे स्टींग ऑपरेशनची चित्रफित त्यांनी प्रसारीत केली.

माझी लढाई ही ड्रग्जच्या विरोधात असून एनसीबीची प्रतिमा मलिक करण्याची नाही. परंतु त्या नावाखाली जे खंडणीचे रॅकेट चालविले जात आहे त्यास माझा विरोध असून यामागच्या मुख्य सुत्रधाराला तुरुंगात घालविल्याशिवाय मी थांबणार नसल्याचा इशारा देत माझ्याविरोधात काहीजण न्यायालयात गेले आहेत. पण मी घाबरणारा नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ज्यांना ज्यांना अशाप्रकारे त्रास दिला जात आहे. त्यांनी पुढे यावे असे आवाहन करत व्हिक्टीम ठरलेल्या लोकांनी आपली बाजू मांडावी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे सांगत सध्या आर्यन खानसह ६ केसेसचा तपास एनसीबीची एसआयटी टीम पुन्हा एकदा करणार आहे. आमची तर मागणी आहे की ६ नाही तर २६ केसेचा तपास पुन्हा करावा आणि जे निर्दोष आहेत त्यांच्या केसेस मागे घ्याव्यात. राज्यातील पोलिसांचीनीही याप्रकरणी तपास सुरु केला आहे. दोन एसआयटीच्या टीम मधून जी काही माहिती येईल त्यानुसार कारवाई होईल असे सांगत यासंदर्भात आणखी माहिती प्रसारीत करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

नवाब मलिक यांनी प्रसिध्द केलेले फोटाग्राफ:-

 

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *