Breaking News

भाजप, रासपाच्या कार्यकर्त्याबरोबर भिवंडीतील या नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला सोहळा

मुंबई: प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दौंड तालुक्यातील भाजप व रासपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर व माजी आमदार रमेश थोरात यांच्या पुढाकाराने दौंड येथील तात्यासाहेब ताम्हाणे, पोपटराव बोराटे, चंद्रकांत कारंडे, दादासो भिसे, जनार्दन सोनवणे, प्रकाश टिळेकर, अशोकराव बोराटे, संतोष जाधव, शिवराम ताम्हाणे, आतिष बोराटे, सतिश खुने, बिभिषण खुने, संतोष ढोरले यांनी प्रवेश केला.

भिवंडी महापालिकेचे उपमहापौर इम्रानअली मोहम्मद खान यांच्यासह १८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भिवंडी महापालिकेचे उपमहापौर इम्रान अली मोहम्मद खान यांच्यासह १८ नगरसेवक,मिरा-भाईंदर महापालिकेच्या माजी महापौर निर्मला सावळे,माजी विरोधी पक्षनेते लियाकत शेख यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. आज भिवंडीसह मिरा-भाईंदर आणि औरंगाबाद सिल्लोडचे ठगन भागवत, अमरावतीमधील डॉ.मोईन देशमुख, निखत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला.आगामी निवडणुकीत या मान्यवरांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीच उपयोग होईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी उपस्थित होते.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *