Breaking News

खासदार विनायक राऊत, काय चावटपणा चालवलाय ? भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांची शिवसेनेवर टीका, वाचा त्यांच्याच भाषेत

एकीकडे तुम्ही नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करायचा, आणि दुसरीकडे शिवसेनेच्या दै.सामना मुखपत्रात खा.संजय राऊतांनी त्याच नाणार रीफायनरी कंपनीकडुन पैसे घेऊन पहिल्या पानावर जाहिराती छापायच्या, वर बिनधडक सांगायचे की हा वर्तमानपत्राच्या उत्पन्नाचा प्रश्न आहे. हे काय चाललंय ?

तुम्ही जाहिराती घेऊन शिवसेनेचे उत्पन्न वाढवायचे, कोकणातील बेरोजगारांनी मात्र उपाशी मरायचे का ? सामनाच्या कार्यकारी संपादकानी म्हणजे खा.संजय राऊतानी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा, नाणारचे काय होणार ? उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी  सांगायचे पक्ष म्हणुन माझी भुमिका निराळी असली, तरी सरकार म्हणुन लोकांचा पाठिंबा असेल तर प्रकल्प नक्की होणार. तिथल्या शिवसैनिकांनीच प्रकल्पाला पाठिंबा दिला तर खासदार  विनायक राऊतांनी त्यांना चप्पलांनी बडवुन काढण्याची धमकी द्यायची ,पक्षातून निलंबित करायचे, हा कसला पक्षप्रमुखांच्याच विचारांना आव्हान देणारा उद्दामपणा ? शिवसैनिक म्हणजे स्थानिक जनता नव्हे का ? शिवसेनेच्या उद्योगमंत्र्याने एमआयडीसीच्या माध्यमातुन जागा खरेदीची अधिसुचना काढायची, तत्पुर्वी आपल्याच बगलबच्चाना तिथल्या जागा विकत घ्या म्हणुन तुम्हीच सांगायचे आणि जे समर्थन करतात त्यांना दलाल म्हणून हिणवायचे, हीच का तुमची संस्कृती ? वेळोवेळी आपली भूमिका सरड्यासारखी सोयीस्करपणे बदलणाऱ्या तुमच्यासारख्या नेत्याला कोकणचा लोकप्रतिनिधी म्हणवून घेणे खरोखरच शोभते का हे आधी स्वतःच्या मनाला विचारा.

७० गावांची देवगड पंचायत समिती पाठींब्याचा ठराव पास करते, तर खासदार महोदय लोकमताचा आदर करण्याऐवजी एका गावातील छोट्या वाडीत जाउन मुठभर लोकांना प्रकल्पाविरोधात भडकवत फिरत आहेत. ,कोवीडच्या पार्श्वभुमीवर सरकारने प्रशासनाने लोकांना घरात बसा म्हणुन सांगायचे, १४४ ,१५१ कलमे लाऊन जमावबंदी करायची, आणि आपण मात्र गावातील देवळामध्ये नाणार विरोधाची सभा घेउन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमासह कायद्याचे तीन-तेरा वाजवायचे ! मा. मुख्यमंत्री, कायदा,  प्रामाणिक शिवसैनिक, कोकणी बेरोजगार तरुण-तरुणी  आणि जनता या सर्वांपेक्षा तुम्ही कदापीही मोठे नाहीत. एवढाच  सत्तेचा माज आला असेल तर

मा. पंतप्रधान मोदीजींच्या  व कोकणी जनतेच्या कृपेने मिळालेल्या खासदारकीचा ताबडतोब राजीनामा द्या व पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन नाणारला स्थानिकांचा पाठिंबा आहे की नाही, ते पहाच!  नाहीतरी तुम्ही कोवीड संकट काळाच कोकणी जनतेला वारया वर सोडलेतच आहे.

ना रोजगाराची तरतुद ,ना आरोग्य सुविधा ,ना कोकणात यायला एस टी ची व्यवस्था ,परप्रांतीय तुपाशी कोकणी माणुस मात्र कायम उपाशी ,तुमची दररोजची उलटी सुलटी विधाने ऐकण्यापेक्षा होऊन जाउ द्या कोकणाच्या भविष्याची आर या पार ची लढाई ।।।।

 

जय महाराष्ट्र! जय कोकण!!

प्रमोद जठार

 

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *