Breaking News

शासकीय गोदामातील कंत्राटी हमाल पद्धत बंद करा राज्यातील हमाल मापाडी महामंडळाची शरद पवारांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील शासकीय गोदामातील हमालांना अन्यायकारक अशी कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी, हमालांना स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, विश्रांतीगृह यासारख्या किमान नागरी सुविधा मिळाव्यात, अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकेचा लाभ मिळावा, अशा विविध मागण्या हमाल मापाडी महामंडळाची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेवून केली.
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या प्रतिनिधींनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा केली.
या बैठकीमध्ये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना राज्यातील शासकीय गोदामातील हमालांच्या प्रश्नांबाबतचे निवेदन या बैठकीत सादर करण्यात आले.
हमाल मापाडी कामगारांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कामगार विभागाने सक्रीय भूमिका घ्यावी याउद्देशाने त्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीस हजेरी लावली.
राज्यातील अनेक भागात हमाल तोलाईदारांना काम नाकारणे, व त्यांची मजुरी आणि लेव्ही माथाडी मंडळात जमा करण्यास नकार देणे आदी प्रकार सुरू असल्याकडे महामंडळाच्या प्रतिनिधींनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील आणि शरद पवार यांचे लक्ष वेधले.
यावेळी तिन्ही विभागाच्या मंत्रिमहोदयांनी हमाल मापाडी कामगारांच्या समस्या तसेच त्यांच्या मागण्यांबाबत सर्वंकष विचार करून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *