Breaking News

‘बाप माणूस’ बनून येताहेत रवींद्र मंकणी

मुंबई: प्रतिनिधी
आजही रवींद्र मंकणी हे नाव उच्चारताच चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये धीरगंभीर भूमिका प्रचंड ताकदीने साकारणारे दमदार अभिनेते ही छबी अनाहुतपणे डोळ्यांसमोर उभी राहते. एखादी मालिका, चित्रपट किंवा नाटक स्वीकारताना चाेखंदळपणे कथानक आणि व्यक्तिरेखेची निवड करण्याच्या सवयीमुळेच मंकणी यांनी आजवर साकारलेल्या सर्वच भूमिका रसिकांच्या मनात घर करणाऱ्या ठरल्या. याच कारणांमुळे मंकणी जेव्हा एखाद्या कलाकृतीत दिसणार याची चाहूल लागते. तेव्हा त्याकडे आपोआप सर्वांचेच लक्ष वेधलं जातं, असा हा उमदा कलाकार आता ‘बापमाणूस’ बनून रसिकांच्या भेटीला येत आहे.
झी युवा वाहिनीवर १८ डिसेंबर पासून ‘बापमाणूस’ या नव्या मालिकेत मंकणी शीर्षक भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या जोडीला या मालिकेत सुयश टिळक, पूजा पवार, पल्लवी पाटील, अजय पुरकर, संग्राम समेळ, संजय कुलकर्णी, शिवराज वाळवेकर, नम्रता आवटे अशी जबरदस्त स्टारकास्ट आणि त्याच्याबरोबरच अभिजित श्वेतचंद्र, ऐश्वर्या तुपे, अभिलाषा पाटील, आनंद प्रभू, श्रुती अत्रे, ज्योती पाटील, अमोल देशमुख आणि बालकलाकार मैथिली पटवर्धन हे कलाकार आहेत. दिवस रात्र न थकता, वादळ वाऱ्याची पर्वा न करता, प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी उभा असणारा , आपल्या कुटुंबाचा रक्षणकर्ता , चंदनासारखा झिजून आपल्या कुटुंबावर मायेची पाखर धरणारा , कुटुंबाला एकत्र बांधून ठेवताना प्रसंगी ओठी कठोर पण पोटी अमाप माया असणाऱ्या, प्रत्येक कुटुंबातील बाप माणसाची ही गोष्ट सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता पाहायला मिळेल.
झी युवावर गाजलेल्या ‘रुद्रम’ या मालिकेचे दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी ‘बापमाणूस’च्या दिगदर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या मालिकेची कथा कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील आहे. या कथेत कोल्हापुरातील एका अशा साध्या माणसाचा प्रवास दाखवला आहे, जो त्याच्या कर्तृत्व आणि तत्त्वांमुळे त्याच्या कुटुंबाचाच नाही. तर, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा बापमाणूस बनतो. कोल्हापुरातील त्याच्या स्थानाला मिळणारं महत्व आणि आदर त्याचबरोबर त्याची संपत्ती मिळवण्यासाठी त्याच्याच कुटुंबातील वाद आणि मतभेद यावर आधारित बाप माणूस ही मालिका आहे.

Check Also

अंकिताचा बिगबॉस च्या घरात पतीवर आरोप; तू माझा वापर केलास”

‘बिग बॉस १७’ हिंदी च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *